साहोचा दुसरा भाग येणार?

साहोचा दुसरा भाग येणार?

साऊथचा सुपरस्टार प्रभास

जवळपास दोन वर्षांपासून प्रभासचे चाहते साहोया चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभासचे चाहते आनंदित होतील अशी एक बातमी प्रभासने आज दिली आहे. बाहुबली प्रमाणेच साहो चित्रपट जर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला तर साहोचा दुसरा भाग सुद्धा येऊ शकतो, अशी शक्यता प्रभासने एका मुलाखतीत बोलून दाखविली आहे.

साहो ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटाने भारतीय चित्रपट क्षेत्रांतील सर्व प्रस्थापित विक्रम मोडीत काढत इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे बाहुबली नंतर साहो हा प्रभासचा पहिलाच चित्रपट आहे. साहो ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. साहोची निर्मिती यु.व्ही. क्रीएक्शन या प्रमुख निर्मिती संस्थेच्या अंर्तगत झाली असून टी सिरीज आणि अनिल थडानी यांची संस्था ए. ए फिल्म्स सुद्धा या चित्रपटात सहभागी आहे, तर दिग्दर्शन सुजीत रेड्डी यांचे आहे.

बाहुबली नंतर प्रभास एका वेगळ्याच रूपात

प्रभासच्या साहोचे ट्रेलर १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आले. या ट्रेलरमध्ये हॉलिवूड सिनेमासारखे भरपूर अॅक्शन सीक्वेन्स असून प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्यात असलेलली केमेस्ट्री अचूक टिपण्यात दिग्दर्शकांना यश आले आहे. बाहुबली नंतर प्रभास एका वेगळ्याच रूपात समोर आला आहे. ट्रेलरला सिनेसमीक्षक तसेच चाहत्यांकडून सामाजिक माध्यमांवर भरगोस प्रतिसाद मिळतो आहे.

प्रभास पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

साहोमध्ये प्रभास एका विशेष अभियानासाठी नेमलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. बाहुबलीच्या अभूतपूर्व यशानंतर साहो तेलुगू सोबतच तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे साहो चित्रपटासाठी प्रभासने हिंदीचे प्रशिक्षण घेतले असून स्वतः हिंदी भाषेतून डबिंग केले आहे.


हेही वाचा – प्रभासच्या चाहत्यांच्या भेटीस ‘साहो’ चित्रपटाचा व्हिडीओ गेम


 

First Published on: August 26, 2019 2:52 PM
Exit mobile version