‘हृताचं विशेष कौतुक’; अनन्या चित्रपटासंदर्भात प्राजक्ताने केली खास पोस्ट

‘हृताचं विशेष कौतुक’; अनन्या चित्रपटासंदर्भात प्राजक्ताने केली खास पोस्ट

मराठी मालिकांमध्ये स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत अभिनेत्री हृता दुर्गुळे(hruta durgule) आता चित्रपटांमधून प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रताप फड यांचं दिग्दर्शन असलेला अनन्या हा चित्रपट २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनन्याचा(ananya) हाच प्रेरणादायी प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून प्रेकक्षकांना पाहायला मिळणार आहे. अनन्याचा हाच प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत. अनन्या चित्रपटाची टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. अशातच अनन्या चित्रपटाचा खास शो सुद्धा आयोजित करण्यात आला होता. या शो साठी मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. सर्वांनीच या चित्रपटाचं खूप कौतुक केलं. नुकतंच अभिनेत्री आणि निवेदिका प्राजक्ता माळी(prajakta mali) हिने सुद्धा अनन्या चित्रपटाचं कौतुक करत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हे ही वाचा –  इमर्जन्सी चित्रपटावर काँग्रेसचा आक्षेप, कंगनासमोर ठेवली ही अट

अनन्या

प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या पोस्टरची सध्या चर्चा सुरु आहे. प्राजक्ताने(prajakta mali) तिच्या शोषलं मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने हृता सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनन्या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रताप फड सुद्धा दिसतात. या फोटोला एक खास कॅप्शन देत चित्रपटाचे आणि हृताचे कौतुक केले आहे. काल ‘अनन्या’ चित्रपट पाहिला. “शक्य आहे, तुम्ही ठरवाल ते शक्य आहे.” हा विचार हा सिनेमा दृढ करतो. माझा दिग्दर्शक मित्र आणि सिनेमाचा लेखक दिग्दर्शक प्रताप फड सर, तुमचं करावं तेवढं कौतूक कमी. हा तुमचा पहिला चित्रपट आहे हे कुठेही जाणवत नाही. #खूपप्रेम #खूपअभिमान. विशेष कौतूक ह्रृताचं. काम खूपच आवडलं. किंबहूना सगळ्यांनीच सुंदर कामं केलीयेत.
त्याचसोबत सुव्रत जोशी, अमेय वाघ आणि रूचा आपटे या माझ्या मित्र मैत्रिणीचं सुद्धा खूप कौतुक. माझे मित्र- मैत्रीण श्रद्धा काकडे आणि अमोल भोर यांचं ही कौतुक. हा अतिशय मनोरंजक आणि आशादायी चित्रपट चूकवू नका मंडळी. अनन्या हा चित्रपट २२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. पुढे प्राजक्ता असंही म्हणाली, (मी चित्रपटात नाही. इतकी हसतेय की गैरसमज होऊ शकतो. म्हणून ही तळ टीप.) असं कॅप्शन प्राजक्ता माळीने कॅप्शन देत चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

हे ही वाचा – हृतिक रोशनचं पुन्हा एकदा ‘शुभ मंगल’? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी

अनन्या(ananya) या चित्रपटातून एक सामान्य मुलीची असामान्य कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटाला प्रेक्षस कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा – ‘टाईमपास ३’ चं कोल्ड ड्रिंक सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला

First Published on: July 20, 2022 5:00 PM
Exit mobile version