९९व्या अखिल भारतीय मराठी नाटसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी

९९व्या अखिल भारतीय मराठी नाटसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी

प्रेमानंद गज्वी

ज्येष्ठ नाटकाकर आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आज नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रेमानंद गज्वी लवकरच ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. प्रेमानंद गज्वी यांच्यासोबतच श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर यांची नावे देखील अध्यक्षपदाच्या स्पर्धेत होती. आज नाट्य परिषदेच्या बैठकीत एकमताने प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली.

हेही वाचा – डॉ. अरुणा ढेरे यांची ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

९९ वे अ. भा. मराठी नाट्यपरिषद लवकरच जाहीर होणार

९९ वे अखिल भारतीय नाट्यसंमेलनाची तारीख नाट्य परिषदेकडून अजून जाहीर झालेली नाही. त्याचबरोबर नाट्यसंमेलनाचे ठिकाणही जाहीर झालेले नाही. सध्या नागपूर, लातूर आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणाची नावे स्पर्धेत आहे. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करुन संमेलनाचे अंतिम ठिकाण ठरवणार आहे.

प्रेमानंद गज्वी यांचे ‘हे’ नाटक फार गाजले

प्रेमानंद गज्वी यांची ‘तनमाजोरी’, ‘किरवंत’ आदी नाटके प्रचंड गाजली. त्यांच्या नाटकांची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली असून देशभरात ठिकठिकाणी त्यांच्या नाटकांचे प्रयोग चालू आहेत. बोधी नाट्य चळवळीमुळे देशभरातील रंगकर्मी त्यांच्याशी जोडले गेले आहेत.


हेही वाचा – नाट्य संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन

First Published on: November 23, 2018 5:09 PM
Exit mobile version