प्रियांका – नीकच्या फोटोवर त्याच्या आईची भावूक कमेन्ट

प्रियांका – नीकच्या फोटोवर त्याच्या आईची भावूक कमेन्ट

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रियांका चोप्राने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे काल गुरूवारी दिल्लीत स्वागत केले. निक जोनास काल दिल्लीत त्याच्या परिवारासह दाखल झाला. प्रियांका तिच्या ‘दि स्काय इज पिंक’ या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी सध्या दिल्लीत आहे. प्रियांकाने त्याचे दिल्लीत स्वागत केले. त्याच्या आगमनाची बातमी तिने आपल्या फॅन्ससोबत इन्स्टाग्रामवर शेअर केली.

देसी गर्ल पीसी हिने सोशल मीडियावर दोघांचा एकदम खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्यांच्यातील प्रेम स्पष्ट दिसत आहे. या फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. चाहत्यांनी या जोडप्याला भरपूर प्रेम दिले आहे. पण या फोटोवरच्या एका कमेन्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती कमेन्ट आहे नीकची आई डेनिस मिलर-जोनास हिची. प्रियांकाने फोटोला कॅप्शन दिले की “वेल्कम होम बेबी”. त्यावर आईने एकदम प्रेमाने कमेन्ट केली आहे.

स्क्रीनशॉट

काल रात्री प्रियांका आणि नीकचे संपूर्ण कुटुंबियांसोब स्नेह भोजन झाले. या कार्यक्रमाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पीसी आणि नीक हातात हात घालून बसलेले दिसत आहेत.

त्यांच्या लग्नाबाबत त्यांनी अद्याप कोणतीही घोषणा केली नसली, तरीही सूत्रांनुसार त्यांचे लग्न जोधपूर येथे होणार आहे. २९ नोव्हेंबर पासून विवाह सोहळ्यांना सुरूवात होणार आहे. एकमेकांच्या संस्कृतींचा मान राखण्यासाठी ते दोन पध्दतीने लग्न करणार आहेत. २ डिसेंबरला हिंदू पध्दतीने तर ३ डिसेंबरला ख्रिश्चन पध्दतीने विवाह सोहळा पार पडणार आहे.

वाचा – प्रियांका-निक दीपवीरप्रमाणे करणार दोन पद्धतीने लग्न

नीक संगीतसाठी डान्स शिकायला भारतात लवकर आला आहे अशी माहिती आहे. संगीतला तो प्रियांकाच्या हिट गाण्यांवर नाचणार आहे जसे की गल्ला गुडीयां, देसी गर्ल आणि पिंगा. गणेश हेगडे संगीतसाठी नृत्य दिग्दर्शन करणार आहेत असेही सांगण्यात आले आहे.

First Published on: November 23, 2018 2:59 PM
Exit mobile version