घरमनोरंजनजोधपूर येथे शाही थाटात होणार प्रियांका-निकचे लग्न?

जोधपूर येथे शाही थाटात होणार प्रियांका-निकचे लग्न?

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आपल्या भावी नवरा निकसोबत जोधपूरला हजेरी लावली. लग्नासाठी पॅलेस पाहण्याकरता ती आली होती, अशा चर्चा रंगल्या आहेत.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि विदेशी बॉय निक जोनस यांच्या लग्नाच्या चर्चा देशातच नव्हे तर परदेशातही रंगत आहेत. प्रियांका मुंबईत विवाहबद्ध होणार की कोणत वेडिंग डेस्टिनेशन शोधणार, का विराट-अनुष्काप्रमाणे परदेशातच लग्नगाठ बांधून परतणार अशा एक ना अनेक चर्चांना बी टाऊनमध्ये उधाण आले आहे. कितीही चर्चा रंगल्या तरी प्रियांका शाही थाटात लग्न करायचे असल्याचे सध्या दिसून येत आहे. आज, मंगळवारी तिने अमेरिकन गायक निक जोनस याच्यासोबत राजस्थान, जोधपूर येथील भव्य अशा उम्मेद भवन पॅलेस आणि मेहरानगड किल्ल्याला भेट दिली असून या महालांमध्ये शाही थाटात लग्नगाठ बांधण्याचा प्रियांकाचा विचार असल्याचे सांगितले जात आहे.

किल्ल्यावरील समारंभ स्थळाला भेट 

प्रियांका चोप्रा आज निकसोबत जोधपूरच्या उम्मेद भवन येथील हॉटेल मॅनेजरला भेटली. त्यांच्याशी चर्चा करून तिने निकला भव्य शाही महाल दाखवला. त्यानंतर त्यांनी मेहरानगड किल्ल्याला भेट दिली. मात्र किल्ल्या दाखवण्याऐवजी प्रियांका ही निकला घेऊन थेट अशा ठिकाणी गेली जिथे शाही थाटातील लग्न लावली जातात. केवळ २० मिनिटच मेहरानगडावर थांबून प्रियांका तेथून निघून गेली.

- Advertisement -

साखरपुड्याचे दागिनेही घेतले होते जोधपूरमधून 

असे म्हटले जाते की, प्रियांकाला उम्मेद भवन पॅलेसमध्येच शाही थाटात लग्न सोहळा पार पाडायचा आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यासाठी तिने हॉटेल मॅनेजरशी चर्चा केली. प्रियांकाने तिच्या साखरपुड्यासाठी ब्रेसलेट आणि रिंगसह इतर दागिने जोधपूरमधूनच बनवून घेतले होते. तिने उम्मेद भवनामध्ये काही दागिन्यांचे काही डिजाईन्स पाहिले होते. यापूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारत क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनीही इटलीमध्ये गुपचुप लग्न केलं होत. मात्र मुंबई येथे शानदार रिसेप्शन सोहळा पार पडला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -