रोबोट २.० – प्रदर्शित होण्यापूर्वीच केली तब्बल ३७० कोटींची कमाई

रोबोट २.० – प्रदर्शित होण्यापूर्वीच केली तब्बल ३७० कोटींची कमाई

रोबोट २.० चित्रपटाचा पोस्टर

सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार यांचा आगामी चित्रपट ‘रोबोट २.०’ सध्या चर्चेत आहे. चित्रपटत प्रदर्शित झाला नसला तरीही चित्रपटासाठी फॅन्स आतूरतेने वाट बघतात आहे. रजनीकांत यांचे चित्रपट सहजच कमाई करुन जातात. रजनीकांत चित्रपटातच नाही तर सामान्य जीवनातही एक सुपस्टार असल्याचे दिसून येते. त्याच्या चित्रपट प्रदर्शित झाल्यावर करोडोंच्या घरात जातो. इतर चित्रपटांनी केलेल्या कामाईचे टार्गेट मोडणे अशी रजनीकांत यांच्या चित्रपटाची ओळख बनत चालली आहे. मात्र त्यांचा आगामी चित्रपट ‘रोबोट २.०’ याने प्रदर्शित होण्यापूर्वीच सर्वे रेकॉर्ड तोडले आहेत. हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शीत केला जाणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची बुकींग करण्यात आली आहे. या चित्रपटाचे राईट्स घेण्यासाठी इतर कंपन्यांनी पैसे मोजले आहेत. यातून चित्रपटाला तब्बल ३७० कोटींची कमाई झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आता पर्यंत झालेली कमाई

बॉलिवूड हंगामा या वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंय दक्षिण भारताच्या राज्यांमधील राइट्स विकण्यात आले आहेत. यात

सॅटेलाइट राइट्स – १२० कोटी रुपये

डिजीटल राइट्स – ६० कोटी रुपये

उत्तर भारतातील राइट्स – ८० कोटी रुपये

आंध्र प्रदेश/ तेलंगना राइट्स – ७० कोटी रुपये

कर्नाटक राइट्स – २५ कोटी रुपये

केरळ राइट्स – १५ कोटी रुपये असे मिळून तब्बल ३७० कोटींची कमाई करण्यात आली आहे.

 सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट मोठ्या बजेट असल्याचे अधीच समजले होते. एखादा भव्य सिनेमा बनवताना त्यात तंत्रज्ञानापासून ते स्पेशल इफेक्टपर्यंत अनेक गोष्टींसाठी परदेशी तज्ञांची मदत घेतली जाते. यामध्ये हा चित्रपट मोठा बजेजचा असला तरी तो तितकेच पैसे मिळवून देणाराही असल्याचे सांगितले जात आहे.

First Published on: November 25, 2018 1:24 PM
Exit mobile version