घरमनोरंजन२.० च्या ट्रेलरमध्ये रिलोडेड चिट्टी रोबो

२.० च्या ट्रेलरमध्ये रिलोडेड चिट्टी रोबो

Subscribe

रजनीकांत आणि अक्षयकुमारच्या बहुचर्चित २.० चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून १ तासात ४ लाखाच्या वर व्ह्यूज या ट्रेलरला मिळाले आहेत. चाहत्यांमध्ये सध्या याच ट्रेलरची चर्चा आहे.

यावर्षीचा सर्वात महागडा आणि बहुचर्चित असणार्‍या २.० या चित्रपटाचे ट्रेलर लाँच झाले असून यामधून निर्माते आणि अभिनेत्यांची मेहनत पुरेपूर दिसून येत आहे. चेन्नईमध्ये अक्षयकुमार आणि रजनीकांतच्या उपस्थितीमध्ये शनिवारी हा ट्रेलर लाँच करण्यात आला असून १ तासात या ट्रेलरला ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. २०१० मध्ये आलेल्या रोबो या चित्रपटाचा हा पुढचा भाग असून या चित्रपटाची चर्चा चित्रीकरणाला सुरुवात झाल्यापासून रंगली होती. दरम्यान हे ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून प्रेक्षकांना हे ट्रेलर आवडत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

काय आहेत नेटिझन्सच्या प्रतिक्रिया?

या चित्रपटाचं ट्रेलर पाहिल्यानंतर आता इंटरनेटवर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. जास्त लोकांना हे ट्रेलर आवडल्याचं यातून दिसत आहे. तर बर्‍याच चाहत्यांचं म्हणणं आहे की, या चित्रपटाकडून बर्‍याच अपेक्षा होत्या आणि आता ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट नक्कीच चांगला असणार याची खात्री पटली आहे. इतकंच नाही तर रजनीकांत आणि पहिल्यांदाच तामिळ चित्रपटात काम करणार्‍या अक्षयकुमारच्याही कामाचं भरभरून कौतुक प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी बराच पैसा खर्च केला असून आतापर्यंतचा हा सर्वात महाग चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. दिग्दर्शन एस. शंकर यांचं असून या चित्रपटाचं संगीत ए. आर. रेहमाननं दिलं आहे. चित्रपटाचं ट्रेलर पाहून प्रेक्षकांना आता नक्कीच चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे हे सोशल मीडियावर येणार्‍या प्रतिक्रियांमधूनही सिद्ध होत आहे.

- Advertisement -

 

पहिल्यांदाच रजनीकांत आणि अक्षयकुमार एकत्र

अक्षयकुमार या चित्रपटातून पहिल्यांदाच रजनीकांतबरोबर दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात त्याची नकारात्मक भूमिका असल्यामुळे त्याची एक वेगळी व्यक्तिरेखाही त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार असल्यामुळे त्याचे चाहतेही सध्या खूष आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -