राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; 10 दिवसांपासून येतोय ताप

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; 10 दिवसांपासून येतोय ताप

राजू श्रीवास्तव यांच्यावर मागील एक महिन्यापासून दिल्लीमधील एम्स रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारली असली तरी अजूनही त्यांना शुद्ध आलेली नाही. त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉक्टर सुद्धा चिंतेत पडले आहेत. राजू श्रीवास्तव गेल्या 33 दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूंच मेंदू सोडल्यास राजूंचे बाकी सर्व शरीर ठिक काम करत आहे. दरम्यान, मागील 10 दिवसांमध्ये इंफेक्शन झाल्यामुळे राजू श्रीवास्तव यांना बऱ्याचदा ताप आला आहे. डॉक्टर त्यांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांच्या व्हेंटिलरची पाइप बदलली आहे. ज्यामुळे त्यांना कोणतही इंफेक्शन होऊ नये. तसेच, इंफेक्शनमुळे त्यांची पत्नी शिखा आणि मुलगी अंतराला देखील राजू यांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी दोघींना राजू यांना भेटण्याची परवानगी दिली होती. परंतु राजू यांना सतत ताप येत असल्यामुळे त्यांना आता भेटू दिलं जात नाही.

याआधी डॉक्टरांनी सांगितली होतं की, जोपर्यंत राजूंचा मेंदू काही काम करत नाही. तोपर्यंत राजू ठिक होणार नाहीत. राजू यांची किडनी, हृदय, लीवर, ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजन लेवल सामान्य आहे. सध्या राजू यांची प्रकृती आधीपेक्षा उत्तम आहे. मात्र शुद्धन आल्याने डॉक्टर चिंतेत आहे.

राजू श्रीवास्तव यांची तब्येत कधी आणि कशी बिघडली?
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचा घेत आहेत. सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांचे निरीक्षण करत आहे.


हेही वाचा :

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा; मुलीने दिली माहिती

First Published on: September 14, 2022 10:58 AM
Exit mobile version