राखीने केली ‘झेड’ सुरक्षेची मागणी; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

राखीने केली ‘झेड’ सुरक्षेची मागणी; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच तिच्या खासगी आयुष्येमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आदिलसोबतच्या घटस्फोटानंतर राखीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यातून तिने आदिलवर अनेक आरोप केले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, ज्यामध्ये राखीने हस्तक्षेप करत असे न करण्याचे आवाहन केले होते.

राखीला देखील आला धमकीचा मेल

नुकत्याच एका पार पडलेल्या कार्यक्रमात राखीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली की, सलमान खान सारखी धमकी मला देखील आली, त्यामुळे मला देखील झेड सुरक्षा हवी आहे. जर कंगना रनौतला देखील सुरक्षा मिळू शकते. तर मला का नाही? या प्रकरणी मी पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहे.” असं राखी म्हणाली. दरम्यान, राखीच्या या अजब मागणीनंतर सोशल मीडियावर नेटकरी तिच्या जबरदस्त खिल्ली उडवू लागली आहेत.

 


हेही वाचा :

‘आदिपुरुष’च्या प्रमोशनला सैफ अली खान राहणार अनुपस्थित; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

First Published on: April 26, 2023 6:27 PM
Exit mobile version