आणि तिने राखी सावंतला आपटलं

आणि तिने राखी सावंतला आपटलं

... आणि राखीला तिने आपटले

परदेशी कुस्तीपटूला चॅलेंज देणं राखी सावंतला चांगलच महागात पडलं आहे. या कुस्तीपटूने राखीला उचललं आणि खाली असं काही आपटलं की ज्यानंतर राखी उठूच शकली नाही. सध्या तिचा हा  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण या व्हिडिओनंतर राखीवर उपचारांची वेळ आली आहे. म्हणूनच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी राखीला रुग्णालयात नेताना
राखीला रॅवलचा जोरदार फटका

 

नेमकं काय झालं?

रॅवल या विदेशी स्पर्धकाने कुस्ती स्पर्धा जिंकल्यानंतर ओपन चॅलेंज दिलं. कोणत्याही भारतीय महिलेने हिमंत असेल तर माझ्यासोबत कुस्ती खेळावी,पण तिचे चॅलेंज कोणीच स्विकारले नाही. राखीने हे चॅलेंज घेतले. वर आल्यावर तिने रॅवलला चिडवले सुद्धा. पण  एका झटक्यात राखीला रॅवलने फ्लोअरवर आपटले आणि मॅच जिंकली. राखी यात इतकी जखमी की तिला तातडीने रुग्णालयात घेऊन जावं लागलं. राखीच्या पाठीला दुखापत झाल्याचे सध्या कळत आहे. स्वत: राखीने देखील तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(सौजन्य- युट्युब)

कुठे सुरु आहे स्पर्धा? 

हरियाणामध्ये सध्या कुस्ती स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा द ग्रेट खलीने आयोजित केली आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू देखील आहेत.या स्पर्धेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

राखी व्हिलचेअरवर?

राखीला कुस्तीपटूने आपटल्यानंतर तिची प्रकृती खालावली.तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिला व्हिलचेअरवरुन नेण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

 

वाचा- राखी सावंत तनुश्रीला म्हणते ‘चार आणा’ दे!

 

पाहा- राखी सावंतने नको त्या ठिकाणी लावले टाळे
First Published on: November 12, 2018 11:49 AM
Exit mobile version