घरट्रेंडिंगराखी सावंत तनुश्रीला म्हणते 'चार आणा' दे!

राखी सावंत तनुश्रीला म्हणते ‘चार आणा’ दे!

Subscribe

राखी सांवतने तनुश्री दत्तावर मानहानीचा दावा ठोकला असून, भरपाई म्हणून केवळ २५ पैशांची मागणी केली आहे.

राखी सावंत आणि तनुश्री दत्ता यांच्यातील भांडणाला आता एक नवं वळण लागलं आहे. राखी सावंततने नुकताच तुश्रीवर मानहानीचा दावा ठोकला असून, नुकसान भरपाई म्हणून २५ पैशांची अर्थात ‘चारआण्यांची’ मागणी केली आहे. #Metoo मोहिमेअंतर्गत सुरु झालेल्या या वादात तनुश्री दत्ता आणि राखी सांवतने एकमेकींवर अनेक आरोप लावले होते. एकीकडे तनुश्रीने ‘हॉर्न ओके प्लीज’ च्या सेटवर गैरवर्तन केल्याचं सांगत नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केले होते, तर दुरीकडे याच सिनेमातील गाण्यात तिला रिप्लेस करणारी राखी सावंत ‘क्लासलेस’ असल्याचंही म्हटलं होतं. तनुश्रीच्या या वक्तव्याला सडेतोड उत्तर देत राखीने, तनुश्री दत्ता ड्रग अॅडिक्ट आणि चरसी असल्याचा आरोप केला होता. इतंकच नाही तर ‘तनुश्री लेस्बियन असून तिने वारंवार माझ्यावर बलात्कार केला होता’, असा आरोपही राखीने तिच्यावर केला होता. या सगळ्या गोंधळादरम्यान तनुश्री दत्ताने राखीवर १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला होता. आता त्यालाच उत्तर देत राखीने तिच्यावर २५ पैशांचा दावा ठोकला आहे. राखीने तिच्या एका व्हिडिओत असं म्हटलं होतं की, ती तनुश्रीवर ५० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार आहे. मग आता ही २५ पैशांची भानगड नेमकी काय आहे? याचं उत्तर राखीने स्वत:च जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात दिलं आहे.

२५ पैसे मागण्यावर राखीचं स्पष्टीकरण…

‘मी तनुश्री दत्ताविरुद्ध ५० कोटींचा मानहानीचा दावा करणार होते. मात्र, देव माझ्या स्वप्नात आला आणि देवाने मला हा नवा मार्ग दाखवला. तनुश्रीची लायकीच तेवढी असल्यामुळे मी तिच्याकडे फक्त २५ पैसे मागितले आहेत. जास्त पैसे देण्याची तिची लायकी नाही. तनुश्रीने केलेल्या चुकांचा भुर्दंड तिच्या आई-वडिलांनी का सहन करायचा? या विचाराने मी तिच्याकडे २५ पैसेच मागितले आहेत. मात्र, यापुढे जर तनुश्रीने माझ्यावर आरोप करणं थांबवलं नाही तर, मी तिच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा ठोकणार.’

आता राखी सावंतच्या या ‘चारआणे’ फिलॉसॉफीला तनुश्री दत्ता काही उत्तर देणार का? उत्तर दिलं तर ते कसं असणार आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता #Metoo मोहिमेला कोणतं वळण लागणार… हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


वाचा: संपावर गेलेल्या Ola, Uber चालकांचा हलकटपणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -