घरमनोरंजनराखी सावंतने नको त्या ठिकाणी लावले टाळे

राखी सावंतने नको त्या ठिकाणी लावले टाळे

Subscribe

राखी सावंतचा देशभरातील तरुणींना अजब सल्ला. बलात्कारापासून वाचण्यासाठी घरातून बाहेर पडताना पैंटीला साखळी आणि टाळे लावा असा सल्ला राखीने दिला आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रा तुनश्री दत्तावर राखीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकून बलात्कारपासून वाचण्यासाठी काय करावे याचा सल्ला सर्व तरुणींना दिला आहे. या व्हिडिओमध्ये राखीने अंडरगारमेंट पैंटीवर साखळी आणि एक मोठा टाळा लावला आहे. राखी या व्हिडिओमध्ये पैंटीला भलीमोठी साखळी आणि टाळा लावून ‘तमंचे पर डिस्को’ या गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडिओद्वारे तिने भारतातील तरुणींना बलात्कारापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि इज्जत वाचवण्यासाठी एक सल्ला दिला आहे.

- Advertisement -

बलात्कारापासून वाचण्यासाठी शोधला उपाय

राखी सावंत आतापर्यंत तिच्या वादग्रस्त विधान, सेक्सी, बोल्ड फोटा आणि व्हिडिओमुळे खूप प्रसिध्द राहिली आहे. बॉलिवूडमध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेवर राखी सावंत आपले विचित्र मतं मांडत असते त्यामुळे ती नेहमी चर्चेत राहते. आता देखील तिने पब्लिसिटी स्टंटसाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला आहे. ज्यामुळे ती अधिकच चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये तिने मी टू आणि लैंगिक शोषणासंदर्भात एक संदेश दिला आहे. बलात्कार आणि लैंगिक शोषणापासून बचाव करण्याचा मार्ग तिने शोधून काढला असल्याचे तिने या व्हिडिओतून सांगितले आहे. यापुढे प्रत्येक मुलीने स्वत:चे रक्षण करण्यासाठी कमरेला साखळी आणि टाळा लावा असा सल्ला तिने दिला आहे.

सायंटिस्ट राखी सावंतचा अजब सल्ला

रोज न्यूजमध्ये मी पाहते. प्रत्येक मुलगी सांगते की, कोणींना कोणी आमच्यावर अत्याचार केले आहे. हिंदुस्तानच्या तरुणींची इज्जत वाचवण्यासाठी मी राखी सावंत सायन्टिस्टने एक उपाय शोधून काढला आहे. “जी लावणार गोदरेजचा टाळा, तिच बनणार बॉलिवूडची बाला”. प्रत्येक मुलीने घराबाहेर पडताना अशाप्रकारे टाळा लावून घराबाहेर पडावे असं तिने म्हटले आहे. असं केल्यामुळे तुमची इज्जत कोणचं लुटणार नसल्याचे राखीने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -