प्रभासच्या गर्लफ्रेंडबाबत राम चरणने केला खुलासा

प्रभासच्या गर्लफ्रेंडबाबत राम चरणने केला खुलासा

टॉलिवूड सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन सध्या त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’चित्रपटामुळे चर्चेत आहेत. परंतु मागील काही दिवसांपूर्वी चित्रपटाव्यतिरिक्त हे दोन्ही कलाकार एकमेकांना डेट करत असल्याच म्हटलं जात होतं. शिवाय प्रभास आणि कृती लवकरच लग्न देखील करणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु आता प्रभास आणि कृतीच्या नात्याबाबत टॉलिवूड सुपरस्टार राम चरणने खुलासा केला आहे.

प्रभास नुकताच नंदामुरी बालकृष्णच्या ‘अनस्टॉपेबल’च्या टॉक शोमध्ये पोहोचला होता. या शोमध्ये प्रभासला काही खासगी प्रश्न देखील विचारण्यात आले शिवाय यावेळी राम चरणला फोन लावण्यात आला. आता हा फोन कॉलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये राम चरण स्पष्ट शब्दांत बोलतोय की, प्रभासचं सर्वात मोठं सिक्रिट हे आहे की, तो सिंगल आहे आणि त्याचे कोणासोबतच प्रेम संबंध नाहीत.

‘आदिपुरूष’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

तुनिषा प्रकरणी शीजान खानच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ

First Published on: December 31, 2022 2:10 PM
Exit mobile version