घरमनोरंजनतुनिषा प्रकरणी शीजान खानच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ

तुनिषा प्रकरणी शीजान खानच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. 24 डिसेंबर रोजी तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. शिवाय तिचे कुटुंबीय देखील पूर्णपणे खचून गेले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी शीजान खानला अटक केली आहे. सुरुवातील शीजानला 4 दिवसाची पोलिस कोठडी झाली होती. या प्रकरणात त्याची कसूली चौकशी केली जात आहे. मात्र, अद्याप काहीही माहिती न मिळाल्याने शीजानच्या कोठीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, आरोपी शीजान खान इतर अनेक मुलींसोबत चॅट करायचा. त्याच्या फोनच्या तपासणी दरम्यान अनेक पुरावे मिळाले आहेत. ज्यातून स्पष्ट होतय की, तुनिषासोबत ब्रेकअप केल्यानंतर आरोपी शीजान खान तिच्याशी फार बोलत नव्हता. तुनिषा त्याला सतत मॅसेज करायची, परंतु तो तिचे मॅसेज बघत नव्हता. तुनिषाच्या आईने पत्रकार परिषदे मध्ये सांगितले होते की, 24 डिसेंबरला शीजानने तुनिषाला मालिकेच्या सेटवर कानाखाली मारली होती.

- Advertisement -

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी तुनिषाला उर्दू शिकण्यासाठी आणि हिजाब घालण्यासाठी देखील सांगत होता. दरम्यान, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी आरोपी शीजान खानच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

तुनिषाच्या आईने केले शीजानवर गंभीर आरोप
शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये तुनिषाच्या आईने शीजान आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “शीजान आणि त्याच्या कुटुंबियांकडून तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जात होता. तसेच तिला बुरखा घालण्यासही सांगण्यात आला होता. शीजानच्या घरचे तुनिषाला मानसिक त्रास देत होते.शूटिंग सुरु झाल्यापासून मागील 2-3 महिन्यात तुनिषाच्या वागण्यात खूप बदल झाला होता. शीजान तुनिषाला त्याच्या घरी घेऊन जायचा. शिवाय शीजानचे दुसऱ्या मुलीबरोबर संबंध असूनही शीजानने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तो तुनिषाला महागड्या भेटवस्तू द्यायचा. तुनिषा शीजानवर प्रचंड प्रेम होती तरीही त्याने तिच्यासोबत ब्रेकअप केला. शिवाय ब्रेकअप केल्यानंतर तिला तुला जे हवं ते कर असं देखील म्हणाला. तुनिषा शीजानपेक्षा दहा वर्षांनी लहान होती. तुनिषा मानाने खूप भावनिक होती हा धक्का दिला सहन झाला नाही. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी.”

- Advertisement -

हेही वाचा :

ब्रेकअपनंतर शीजान तुनिषाच्या मेसेजला रिप्लाय देत नव्हता, मुंबई पोलिसांनी दिली माहिती

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -