रामायण फेम ‘आर्य सुमंत’ चंद्रशेखर वैद्य यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

रामायण फेम ‘आर्य सुमंत’ चंद्रशेखर वैद्य यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

रामायण फेम 'आर्य सुमंत' चंद्रशेखर वैद्य यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

पौराणिक मालिका रामायण (Ramayana) फेम ‘आर्य सुमंत’ (Arya Sumant) म्हणजेच बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते चंद्रशेखर वैद्य (Chandrasekhar Vaidya) यांचे आज निधन झाले. (Ramayana fame ‘Arya Sumant’ Chandrasekhar Vaidya Passes Away at the age of 98 in mumbai )ते ९८ वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या अंधेरी येथील राहत्या घरी आज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्याची तब्येत बिघडली होती त्यामुळे त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले. त्याच्यासाठी घरीच ऑक्सिजनची सुविधा देखील करण्यात आली होती. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. माझे वडिल झोपेतच गेले अशी माहिती त्याचा मुलगा अशोक याने ई टाइम्सला दिली.

दिवंगत अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांनी ५० ते ९० च्या दशकात सिनेसृष्टीत अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. पौराणिक मालिका रामायण मधील त्यांची महाराज दशरथ यांचे महामंत्री आर्य सुमंत ही भूमिका फार लोकप्रिय झाली होती. गेट वे ऑफ इंडिया, बरसात की रात, कटी पतंग, द बर्निंग ट्रेन, नमक हलाल,डिस्को डान्सर,शराबी,त्रिवेदी सारख्या लोकप्रिय सिनेमात त्यांनी काम केले आहे.

चंद्रशेखर वैद्य यांचा जन्म ७ जुलै १९२३ रोजी हैद्राबाद येथे झाला. रामायण मालिकेत काम करताना त्यांचे वय ६५ वर्ष होते. चंद्रशेखर लहान असतानाच त्यांची आई वारली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यांची सावत्र आई त्यांच्याहून लहान होती. वयाच्या १३ व्या वर्षी चंद्रशेखर यांचे लग्न झाले. १९४२ मध्ये चंद्रशेखर यांनी भारत छोडो आंदोलनात देखील सहभाग घेतला होता.

चंद्रशेखर करिअर करण्यासाठी मुंबईत आले. राम गोपाल वर्मा यांच्या सिनेमात त्यांनी काम केले. मुंबईत येताना त्यांच्या खिशात केवळ ४० रुपये होते. अनेक स्टुडिओत फिरुन शेवटी त्यांना एका ठिकाणी छोटेसे काम मिळाले होते. १९५० आलेला ‘बेबस’ हा चंद्रशेखर यांचा पहिला सिनेमा होता. आज चंद्रशेखर वैद्य यांची मुलगी रेनू आरोडा ही पॅथोलॉजिस्ट आहे तर मुलगा अशोक आणि अनिल अमेरिकेत सेटल झालेत.


हेही वाचा – HBD : नक्षलवाद्याचा झाला हिरो, एक टेकमध्ये सीन शूट करायचे मिथुन चक्रवर्ती

 

 

 

 

First Published on: June 16, 2021 1:10 PM
Exit mobile version