Ramesh Deo : सिनेसृष्टीतला देव हरपला…,ज्येष्ठ अभिनेते रमेश देव अनंतात विलीन

Ramesh Deo : सिनेसृष्टीतला देव हरपला…,ज्येष्ठ अभिनेते रमेश देव अनंतात विलीन

Ramesh Deo : सिनेसृष्टीतला देव हरपला..., ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

ज्येष्ठ मराठी अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी दिली. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यावर गुरुवारी विलेपार्लेच्या पारसी वाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी रात्री ८:३० वाजता रमेश देव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनयातील देव आज अनंतात विलीन झाला. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. रमेश देव यांच्या अंत्यदर्शनावेळी त्यांचा मुलगा अभिनेता अंजिक्य देव यांना अश्रू अनावर झाले होते. रमेश देव यांच्या जाण्याने सिनेसृष्टीची अपरिमीत हानी झाली.

“डॉक्टरांनी बाबांना वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला होता. आम्हाला असं काही होईल याची जराही कल्पना नव्हती. कारण ते प्रचंड सकारात्मक होते. याआधीही अनेकदा ते मृत्यूच्या दारातून परत आले होते. त्यामुळे आताही ते बरे होतील असा विश्वास आम्हाला होता मात्र, आमचे बाबा आम्हाला कायमचे सोडून गेलेत, असं अजिंक्य देव म्हणाले. बाबांना निरोप देताना अंजिक्य देव यांना अश्रू अनावर झाले. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय.

‘मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतला देव हरपला’, अशा प्रतिक्रिया देत सिनेमासृष्टी तसेच राजकीय नेते आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. रमेश देव यांची धीरुभाई अंबानी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. मराठी सिनेसृष्टीत नायक आणि खलनायक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावून महाराष्ट्र आणि देशातील प्रेक्षकांच्या मनात घर केले.

रमेश देव यांना बुधवारी प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटूंबाला धक्का बसला आहे. आज 3 फेब्रुवारीला सकाळी 10 : 30 वाजता अंधेरीतील घरी रमेश देव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दुपारी अडीच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. दुपारी विलेपार्ले पूर्व येथील पारसी वाडा येथे रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशानं त्यांच्यावर भरभरुन प्रेम केलं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना सर्वांनी करावी, असं आवाहन रमेश देव यांचे सुपुत्र अजिंक्य देव (Ajinkya DeO) यांनी केले. जुहूतील रुपरंग सोसायटी येथील त्यांच्या निवासस्थानीच अभिनेते रमेश देव यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची,  माहीती अजिंक्य देव यांनी दिली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता महेश मांजरेकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.


हे ही वाचा – Ramesh Deo Passes Away: अशी आहे रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी


 

First Published on: February 3, 2022 2:59 AM
Exit mobile version