Ranbir Alia Wedding: अखेर तो क्षण आला, रणबीर-आलिया घेणार आज सात फेरे

Ranbir Alia Wedding: अखेर तो क्षण आला, रणबीर-आलिया घेणार आज सात फेरे

Ranbir Alia Wedding: अखेर तो क्षण आला, रणबीर-आलिया घेणार आज सात फेरे

लाखो चाहत्यांची प्रतिक्षा अखेर आज संपणार आहे. बॉलिवूडचे मोस्ट ब्युटीफूल कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आज सात फेरे घेऊन लग्नबंधनात अडकणार आहे (Ranbir Kapoor and Alia Bhatt’s wedding rituals kick off today). आजपासून रणबीर-आलिया आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात करणार आहे.

मागील कित्येक वर्षांपासून रणबीर-आलियाच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. कोरोना महामारीचा काळ असल्यामुळे त्यांनी गेल्यावर्षी लग्न केले नाही. पण अखेर रणबीर-आलियाच्या सप्तपदीचा क्षण आला आहे. आज सकाळपासून रणबीर-आलियाच्या लग्न सोहळ्याच्या विधीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर चुडा आणि पगडी बांधण्याचा विधी होणार आहे. माहितीनुसार दुपारी २ किंवा ३ वाजता रणबीर-आलिया सात फेरे घेतली. अशाप्रकारे हे बहुचर्चित कपल आज दुपारनंतर मॅरिड कपलच्या यादीत सामील होतील. दरम्यान आलियाची बहीण शाहीन भट्ट लग्नापूर्वी निवासस्थानी पोहोचली आहे.

काल आलियाने हातावर रणबीरच्या नावाची काढली मेहंदी

आलियाने आपला ड्रीम मॅन रणबीर कपूरच्या नावाची मेहंदी काढली आहे. काल, १३ एप्रिलला रणबीर आणि आलियाचा मेहंदीचा सोहळा झाला. यावेळी दोघांचे कुटुंबिय उपस्थित होते. तसेच यादरम्यान करीना कपूर आणि करिश्मा कपूर स्पॉट झाल्या.


हेही वाचा – KGF Chapter 2: १० हजारांहून अधिक स्क्रिन्सवर ‘केजीएफ २’ प्रदर्शित; पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई करण्याचा अंदाज


First Published on: April 14, 2022 10:34 AM
Exit mobile version