घरताज्या घडामोडीKGF Chapter 2: १० हजारांहून अधिक स्क्रिन्सवर 'केजीएफ २' प्रदर्शित; पहिल्याच दिवशी...

KGF Chapter 2: १० हजारांहून अधिक स्क्रिन्सवर ‘केजीएफ २’ प्रदर्शित; पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई करण्याचा अंदाज

Subscribe

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर २’ आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची स्क्रिन्स पाहता बॉक्स ऑफिसवर तुफान ओपनिंग करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर यावर्षी एकापाठोपाठ एक बिग-बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहे.

तेलुगू चित्रपट ‘आरआरआर’च्या दमदार एँट्रीनंतर आता कन्नड चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर २’ जगभरात १० हजारांहून अधिक चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहेत. ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड ब्रेक करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत या चित्रपटाची निर्मिती करणारी कंपनी होमबेल फिल्म्सने माहिती सोशल मीडियावर जारी केली आहे.

- Advertisement -

ट्रेड रिपोटच्या माहितीनुसार, ‘केजीएफ चॅप्टर २’ हिंदी भाषेतही मोठ्या प्रमाणात प्रदर्शित केला जाणार आहे. हिंदी प्रेक्षकांमधील ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाची क्रेझ पाहता उत्तर भारतातील ४४००हून अधिक स्क्रिन्सवर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर दक्षिण भारतात फक्त २६०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. हेच परदेशात उलट चित्र आहे, हिंदी भाषेत ११०० स्क्रिन्सवर आणि दक्षिण भारतीय भाषेत २९०० स्क्रिन्सवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही चित्रपटगृहात सकाळी ६ वाजल्यापासून ‘केजीएफ चॅप्टर २’ शो सुरू झाले आहेत.

- Advertisement -

 

ऑनलाईन ४० लाखांहून अधिक तिकीट विक्री

‘केजीएफ चॅप्टर २’बाबत हाईप, ट्रेंड आणि अॅडवांस बुकिंगचे आकडे पाहून ट्रेडने चित्रपट पहिल्यांच दिवशी १०० कोटींचा गल्ला सर्व भाषेत भरणार असल्याचा अंदाज वर्तवला. पण ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांचे म्हणणे आहे की, ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपट सर्व भाषेत ७५ कोटींची कमाई पहिल्या दिवशी करू शकतो.’ ऑनलाईनद्वारे ४० लाखांहून अधिक ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाच्या तिकीटांची विक्री झाली आहे.

दरम्यान ‘केजीएफ चॅप्टर २’ची पायरेसी आणि ऑनलाईन लीक होण्यापासून वाचवण्यासाठी निर्मात्यांनी पूर्ण व्यवस्था केली आहे. यासाठी अँटी पायरेसी कंट्रोल रुम बनवली आहे, ज्या अंतर्गत काही व्हॉट्सअॅप नंबर जारी केले आहेत. या नंबरद्वारे पायरेसीची सूचना दिली गेली आहे. तसेच यासोबत लिहिले की, ‘केजीएफ बनण्यासाठी आठ वर्षांची मेहनत आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना व्हिडिओ करू नका आणि इंटरनेटवर अपलोड करू नका,’ अशी विनंती केली आहे.


हेही वाचा – केजरीवालांविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी सोनू निगमला मुंबई आपची चेतावणी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -