सौरभ गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूरची वर्णी ?

सौरभ गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूरची वर्णी ?

सौरभ गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूरची वर्णी ?

बॉलिवूडमध्ये (bollywood)गेल्या काही वर्षांपासून बायोपिक सिनेमाचा क्रेझ प्रचंड वाढत आहे. क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी (Mahendra singh Dhoni)याच्यावर आधारीत बायोपिक एमएस धोनी रिलीज झाल्यानंतर आता भारतीय पूर्व क्रिकेट संघाचे कॅप्टन सौरभ गांगुली(sourav ganguly) यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक लवकरच भेटीला येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. लव फिल्म यांच्या निर्मीती अंतर्गत तयार होणाऱ्या या बहुचर्चित बायोपिकच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात होणार असून यामध्ये सौरभ गांगुली यांच्या मुख्य भूमिकेत कोणता कलाकार झळकणार आहे याची चर्चा आता सगळीकडे रंगू लागली आहे.(Ranbir Kapoor will Play Sourav Ganguly Role In His Biopic)

एका मुलाखती दरम्यान सौरभ गांगुली यांना मुख्य भूमिका कोण साकारणार आहे याबाबत विचारण्यात आले होते तेव्हा ते म्हणाले की, चित्रपटाचे मेकर्स सहमतीने स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर या रोलसाठी योग्य अभिनेत्याची निवड करतील. तसेच रणबीर कपूर(Ranbir Kapoor) माझी भूमिका साकारू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र हा निर्णय सिनेमाच्या निर्मात्यांचा आणि दिग्दर्शकांचा आहे. सौरभ गांगूलीच्या वक्तव्यानंतर अभिनेता रणवीर कपूरच्या नावाची तुफान चर्चा आता सोशल मीडियावर रंगत आहे.

‘अ सेंच्युरी इज नॉट इनफ’ या पुस्तकावरल हा बायोपिक असणार आहे. सौरभ गांगुलीने स्वत: हे पुस्तक लिहिले आहे. बायोपिकद्वारे आपल्याला भारतीय क्रिकेटचा दादा अर्थात सौरभ गांगुलीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.


हे हि वाचा – Siima Award 2021 रश्मिकाला मिळाला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा अवॉर्ड तर महेश बाबू ठरला सर्वोत्कृष्ठ अभिनेता

First Published on: September 19, 2021 2:56 PM
Exit mobile version