दीपिका वहिनींसाठी नंदेने आयोजित केली पार्टी

दीपिका वहिनींसाठी नंदेने आयोजित केली पार्टी

पार्टीमध्ये नाचताना दीपविर

नुकतेच विवाहीत झालेले रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण काल इटलीहून मुंबईला परतले. लग्नानंतर सध्या ते आपल्या नातेवाईकांना भेटण्यात व्यस्त आहेत. रणवीर आणि दीपिका कोणालाही नाराज न करता सगळीकडे उत्साहाने जातात आहे. काल रात्री (२४ नोव्हेंबर २०१८) रणवीरची बहिण रितिका भगनानी हिने आपल्या लाडक्या वहिनीसाठी ग्रँन्ड पार्टीचे आयोजन केले. या पर्टीत रणवीर दीपिकाही खूप नाचलेत. रणवीर दीपिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या फॅन्सने त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. रणवीरही या पर्टीत बेफाम होऊन नाचला. शनिवारी रात्री मुंबईतील हॉटेल ग्रँन्ड हयातमध्ये या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या हॉटेलमध्ये DJ नाइट्सचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी रणवीर सिंग याने डिझाइनर मनीष अरोराने बनवलेले कपडे घातले होते. आपल्या नंदेकडून मिळालेल्या या पर्टीमुळे दीपिकाही आनंदात होती.

मुंबईत आल्यावर फॅन्सने केले स्वागत

नुकतेच विवाहीत झालेले रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नुकतेच इटलीहून मुंबईला परतले. विमानतळावरच फॅन्सने आणि मीडियाने त्यांना घेरले आणि त्यांच्या अवती-भवती घोळका केला होता. दोघांनीही आपल्या कारमधून परतन्याआधी मीडियासाठी पोज केलं आणि एकदम हसून नमस्कार केला. इटलीत लेक कोमो येथे १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी त्यांचा कोंकणी आणि सिंधी पध्दतीने विवाह सोहळा पार पडला होता. दोघांनीही प्रत्येक सोहळ्यातील एक फोटो, असे एकूण दोन फोटोज सोशल मीडियाद्वारे आपल्या फॅन्स सोबत शेअर केले.

First Published on: November 25, 2018 12:51 PM
Exit mobile version