दीपिकासोबत रणवीर राहणार NCB कार्यालयात उपस्थित; विशेष परवानगीचा केला अर्ज

दीपिकासोबत रणवीर राहणार NCB कार्यालयात उपस्थित; विशेष परवानगीचा केला अर्ज

या धक्कादायक समोर आलेलं नाव म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण, एनसीबीने समन्स बजावल्यानंतर दीपिका आज नवरा रणवीर बरोबर मुंबईत दाखल झाली

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर समोर आलेले ड्रग्ज कनेक्शन संपूर्ण बॉलिवूडला विळखा घालू लागले आहे. या प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावण्यात आले आहेत. उद्या, शुक्रवारी दीपिका पदुकोण एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर होणार आहे.

दरम्यान, एनसीबीचे समन्स मिळाल्यानंतर सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण काल, गुरूवारी रात्री मुंबईत दाखल झाली आहे. तिने एनसीबीला आपण २६ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळवले आहे. दीपिकाला डिप्रेशनचा त्रास असल्याने या चौकशी दरम्यान दीपिकाच्यासोबत राहता यावे म्हणून रणवीर सिंहने एनसीबीला विनंती केली आहे.

काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणी तपासात एनसीबीला अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचे ड्रग्जसंबंधीचे चॅट सापडले. त्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणला एनसीबीने समन्स बजावला आहे. मात्र अभिनेता रणवीर सिंग याने एनसीबीकडे सोबत उपस्थित राहण्याची परवानगी मागितली आहे. यासंदर्भात त्याने एनसीबीकडे अर्ज देखील दिला आहे. यामध्ये त्याने असे म्हटले आहे की, दीपिकाच्या चौकशीदरम्यान त्याने तिथे असणे आवश्यक आहे कारण तिला कधी कधी पॅनिक अॅटॅक येतात आणि भीती देखील वाटते. त्यामुळे त्याला दीपिकाबरोबर असण्याची परवानगी देण्यात यावी.

हेही वाचा –

‘आधी हात जोडत होतो, आता दिल्लीच्या भिंती हलवून सोडू’; मोदींच्या अडचणी वाढणार?

First Published on: September 25, 2020 12:20 PM
Exit mobile version