घरदेश-विदेश'आधी हात जोडत होतो, आता दिल्लीच्या भिंती हलवून सोडू'; मोदींच्या अडचणी वाढणार?

‘आधी हात जोडत होतो, आता दिल्लीच्या भिंती हलवून सोडू’; मोदींच्या अडचणी वाढणार?

Subscribe

केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या कृषीविषयक कायद्याच्या विरोधात देशभरातले शेतकरी आज आंदोलन करत आहेत. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याचं देखील दिसत आहे. हे विधेयक लोकसभेमध्ये मंजुरीसाठी येण्याआधीच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या मंत्री आणि NDA चा घटकपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या महत्त्वाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या मुद्द्यावरून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. केंद्र सरकारची कृषीविषयक धोरणं आणि प्रस्तावित विधेयक शेतकरी विरोधी आहे, असं म्हणत हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला होता. आता त्यांनी केंद्र सरकारला थेट जाहीर इशाराच दिला आहे. ‘आत्तापर्यंत आम्ही हात जोडत होतो. आता दिल्लीच्या भिती हलवून सोडू’, असा जाहीर इशारा हरसिमरत कौर यांनी दिला आहे.

बादल यांची उघड बंडखोरी त्रासदायक ठरणार?

केंद्र सरकारमध्ये शिरोमणी अकाली दल देखील सत्तेत मित्रपक्ष आहे. त्यांच्या पक्षाचे प्रमुख आणि हरसिमरत कौर बादल यांचे पती सुखबीरसिंग बादल यांनी देखील हरसिमरत यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. मात्र, राजीनामा दिला असला, तरी शिरोमणी अकाली दल केंद्र सरकारला पाठिंबा देत राहणार, असं बादल यांनी जाहीर केलं होतं. मात्र, आता हरसिमरत कौर यांनी ‘दिल्लीच्या भिंती हलवून सोडू’, असं म्हणत थेट केंद्र सरकारला उघड उघड आव्हानच दिलं आहे. त्यामुळे देशातलं कोरोनाचं संकट, कृषी विधेयकाला विरोधकांसोबतच देशभरातल्या अनेक शेतकरी संघटनांचा विरोध, बिहारमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका या सगळ्यामध्ये आता एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये असलेली नाराजी अशा कात्रीत एनडीए अडकल्याचं बोललं जात आहे.


हेही वाचा – दिल्लीत राजकीय खळबळ, मोदी सरकारच्या शेतीविषयक धोरणांच्या विरोधात केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -