सुप्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांना हृदय विकाराचा झटका; दिल्ली हॉस्पिटलमध्ये दाखल

सुप्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांना हृदय विकाराचा झटका; दिल्ली हॉस्पिटलमध्ये दाखल

सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांना हृदय विकाराचा झटका आला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांना दिल्लीच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या भावाने याबाबत माहिती दिली आहे.

वर्कआउट करताना झाला त्रास
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जीममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर एक्सरसाईज करत असताना त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि ते खाली पडले. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांना तत्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. राजू यांच्या पीआरओने सांगितले की, राजू श्रीवास्तव पक्षातील काही मोठ्या नेत्यांना भेटण्यासाठी थांबले होते. सकाळी ते जीम करण्यासाठी हॉटेलच्या जीममध्ये गेले. त्यावेळी वर्कआउट करता करता त्यांना हृदय विकाराचा झटका आला. दरम्यान, राजू यांच्या पीआरओने सांगितले की, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती आता ठिक आहे.

दरम्यान, राजूंची प्रकृती खराब होण्याची बातमी कळताच राजू यांचे चाहते निराश झाले आहेत. ते लवकर बरे व्हावे याची अनेकजण कामना करत आहेत. राजू श्रीवास्तक एक प्रसिद्धा कॉमेडियन असून ते उत्तर प्रदेशमधील विकास परिषदेचे चेअरमन देखील आहेत.

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ कार्यक्रमाने मिळाली ओळख

राजू श्रीवास्तव यांना कॉमेडीचा बादशाह म्हटलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ या कार्यक्रमाने राजू श्रीवास्तव यांना ओळख दिली.


हेही वाचा :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २२ व्या भारत नाट्य महोत्सवाचे उद्‌घाटन

First Published on: August 10, 2022 3:00 PM
Exit mobile version