‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील रुबियस हॅग्रिडचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन

‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील रुबियस हॅग्रिडचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन

हॉलिवूडमधील हॅरी पॉटर या चित्रपटाची सीरिजला संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. या सीरीजने मोठमोठे रेकॉर्ड ब्रेक केले होते. या चित्रपटाची पहिली सीरिज 2002 साली प्रदर्शित झाली होती. त्यानंतर लागोपाठ या चित्रपटाच्या सात सीरीज प्रदर्शित झाल्या. यातील प्रत्येक सीरिजने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. आजही या चित्रपटाचे जगभरात करोडो चाहते आहेत. दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटामध्ये रुबियस हॅग्रिड हे पात्र साकरणाऱ्या रॉबी कोल्ट्रेन या अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जगभरातून ‘हॅरी पॉटर’ चित्रपटाच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून रॉबी कोल्ट्रेन यांची प्रकृती खराब होती. रुग्णालयात उपाचारांदरम्यान त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रॉबी कोल्ट्रेन यांच्या निधनाची बातमी कळताच हॉलिवूड कलाकारांनी तसेच तेथील राजकीय नेत्यांनीही शोक व्यक्त केला आहे.

रॉबी कोल्ट्रेन यांना ‘हॅरी पॉटर’मधील रुबियस हॅग्रिड पात्रामुळे मिळाली ओळख
अभिनेते रॉबी कोल्ट्रेन यांना हॅरी पॉटर’मधील रुबियस हॅग्रिड पात्रामुळे ओळख मिळाली होती. त्यामुळे अनेकजण त्यांना त्यांच्या चित्रपटातील नावामुळेच ओळखतात. शिवाय ते एक उत्तम लेखक देखील होते. रॉबी कोल्ट्रेन यांना लागोपाठ तीन वेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार मिळाला होता ज्यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले होते. त्यांनी ‘हॅरी पॉटर’ चित्रपटा व्यतिरिक्त त्यांनी अनेक सुपरहिट हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते.

 


हेही वाचा :

तुम्ही तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात; सुप्रीम कोर्टाकडून एकता कपूरची कानउघाडणी

First Published on: October 15, 2022 11:51 AM
Exit mobile version