घरमनोरंजनतुम्ही तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात; सुप्रीम कोर्टाकडून एकता कपूरची कानउघाडणी

तुम्ही तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात; सुप्रीम कोर्टाकडून एकता कपूरची कानउघाडणी

Subscribe

एका वेब सीरिजच्या माध्यमातून सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान केल्याबद्दल एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे करण्यात आला होता.

मागील काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध चित्रपट आणि हिंदी टेलिव्हिजनची निर्माती एकता कपूर आणि तिची आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खरंतर हा गुन्हा एका वेब सीरिजच्या माध्यमातून सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान केल्याबद्दल एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे करण्यात आला होता. यांच प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टने शुक्रवारी एकता कपूरच्या वेब सीरिजमध्ये आक्षेपार्ह दृश्यांबाबत न्यायालयाने तिच्यावर ताशेरे ओढले आहेत.

एकता कपूरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने देखील कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. ज्याची आता सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान, कोर्टाने एकता कपूरवर ताशेरे ओढत म्हटलं की, तुम्ही देशाच्या युवा पिढीची मानसिकता दूषित करत आहात.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने सुनावले
न्या. अजय रस्तोगी आणि न्या. सी टी रविकुमार यांनी सुनावणी दरम्यान सांगितले की, “काहीतरी करायला हवे, तुम्ही या देशाची युवा पिढी दूषित करत आहात. ओटीटी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांपुढे चांगले पर्याय ठेवायला हवे, मात्र तुम्ही याउलट तुम्ही तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात.”

भाजप नेत्यांनी केला होता गुन्हा दाखल
मागील काही दिवसांपूर्वी भाजपा नेता आणि माजी सैनिक यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मते ट्रिपल एक्स (xxx) मधील सीझन-2 मध्ये भारतीय सैनिकांचा घोर अपमान करण्यात आला आहे. याबद्दल बेगुसराय न्यायालयाचे वकील ऋषिकेश पाठक यांनी सांगितले की, वेब सिरीजमध्ये असं दाखण्यात आलंय की, जेव्हा भारतीय सैनिक त्यांच्या ड्युटीवर असतात तेव्हा त्या सैनिकांची पत्नी घरी तिच्या मित्रांना बोलवते आणि त्यांना सैनिकाची वर्दी घालते आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवते. या वेब सीरीजमुळे सैनिकांच्या मनाचे खच्चीकरण्याचा प्रयत्न चालू आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

वेब सीरिजमधून भारतीय सैनिकांचा अपमान केल्याच्या प्रकरणात एकता कपूरविरोधात गुन्हा दाखल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -