दिवाळीमध्ये सलमान खान करणार ‘भाईजान’ रिलीज

दिवाळीमध्ये सलमान खान करणार ‘भाईजान’ रिलीज

यंदा ईदला नाही तर दिवाळीमध्ये सलमान खान करणार ‘भाईजान’ रिलीज

बॉलिवूडचा दंबग स्टार अभिनेत सलमान खानचा नुकताच ‘राधे: योर मोस्ट वॉटेड भाई’ हा सिनेमा चित्रपट समिक्षकांच्या काही खास पसंतीस उतरला नाही. इतकच नाही तर आजचा प्रेक्षकवर्ग आशयघन चित्रपट पाहण्यावर भर देत असल्याचे दिसतेय. सलमान पर्यंत प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया तर पोहोचल्याच असतील. ‘रेस 3’ चित्रपटानंतर सलमानचे अनेक सिनेमा प्रेक्षकांवर हवी तशी जादू दाखवू शकला नाही. यादरम्यान रिलीज झालेला सिनेमा ‘भारत’, ‘दबंग 3’ ने बॉक्स ऑफीसवर गल्ला जमवला असाल तरी लोकांच्या मनावर भूरळ पाडू शकला नाही. सलमानला आता चांगलेच लक्षात आले आहे की जर चांगला कंटेट फुल सिनेमा लोकांना दाखवला नाही तर बॉक्स ऑफिसच्या खिडक्या देखिल लवकरच बंद होतील.

अशातच सलमानने आता आपली रणनीतीमध्ये बदल करत ताबडतोब एका फॅमिली ड्रामा सिनेमाचं शुटींग पुर्ण करणार आहे. या सिनेमाची घोषणा बकरी इद च्या मुहूर्तावर करण्यात येणार असून सिनेमा दिवाळीत रिलीज करण्यात येणार आहे. माहिती नुसार साजिद नाडियाडवाला यांच्या दिग्दर्शना अंतर्गत तयार होणार सिनेमा ‘किक 2’ सध्या बंद पडला आहे. सलमान या आधी साजिद यांचाच सिनेमा ‘कभी ईद कभी दीवाली’ शुटींग पुर्ण करणार आहे . तसेच या सिनेमाचे नाव बदलून ‘भाईजान’ हे नाव ठेवण्यात येणार आहे हा सिनेमा एका साउथ फिल्म रिमेक आहे.


हे हि वाचा – अश्लील गाण्यावर मी ॲक्टींग केली यासाठी माफ करा..रवि किशन

First Published on: June 16, 2021 7:17 PM
Exit mobile version