निर्माता समीर विद्वांसने कलाकारांच्या वतीने जोडले प्रेक्षकांसमोर हात, म्हणाला…

निर्माता समीर विद्वांसने कलाकारांच्या वतीने जोडले प्रेक्षकांसमोर हात, म्हणाला…

निर्माता समीर विद्वांसने कलाकारांच्या वतीने जोडले प्रेक्षकांसमोर हात, म्हणाला...

धुराळा,आनंदी गोपाळ,वाय झेड,डबल सीट,लोकमान्य, क्लासमेट अशा अनेक मराठी सिनेमांची निर्मिती करणारा निर्माता समीर विद्धांसने त्याच्या अनेक दर्जेदार सिनेमांमधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. समीरने नुकतचं एक ट्विट केलंय ट्विटमधून समीरने सध्याची सिनेसृष्टीची गरज लक्षात घेऊन प्रेक्षकांना थेट हात जोडून सिनेमा पाहण्याठी सिनेमागृहात जाण्याची विनंती केली आहे. समीरच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

समीर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेली दीढ वर्ष सगळ्यांसाठी आर्थिक गणित कोलमडून टाकणारे गेलय आणि अजूनही जात आहे. मनोरंजन क्षेत्रही ह्यातून सुटले नाही. लाखो कुटुंब पोळली गेली, काही अजूनही झगडत असल्याचे समीरने म्हटले आहे. सिनेसृष्टीत निर्मात्यांनी करोडोंची गुंतवणूक केली मात्र मागील २ वर्षापासून ही गुंतवणूक अडकून असल्याचे समीरने सांगितले. यातून बाहेर येण्यासाठी, सिनेमाची गाडी रुळावर आणण हे पूर्णपणे प्रेक्षकांच्या हातात असल्याचे समीरने म्हटले आहे.

समीरने प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचे आवाहन करत म्हटले आहे की, आम्हा सगळ्या कलाकारांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की येणारे मराठी सिनेमे शक्य तितके सिनेमागृहात जाऊन पहा. नाही आवडले तर तस मनमोकळेपणाने सांगा तो तुमचा हक्क आहे. तुम्ही जर भरभरुन प्रतिसाद दिलात तरच आपली सिनेसृष्टी पुन्हा हळू हळू रांगायला चालायला आणि मग धावायलाही लागेल. समीरने ट्विटच्या शेवटी सिनेमागृह आणि नाट्यागृह पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती देखील केली आहे.

 


हेही वाचा – ‘झिम्मा’ प्रेक्षकांच्या भेटीला, ‘पांडू’ने दिल्या शुभेच्छा

First Published on: November 19, 2021 3:21 PM
Exit mobile version