Video : त्या तिघांचा प्रवास…Sadak 2 ट्रेलर प्रदर्शित

Video : त्या तिघांचा प्रवास…Sadak 2 ट्रेलर प्रदर्शित

सडक २

गेले काही दिवस ज्या चित्रपटाची चर्चा आहे असा अभिनेता संजय दत्त, आलिया भटट् आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सडक २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. महेश भट्ट यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या तीन मिनीटांच्या ट्रेलरमध्ये प्रत्येक भूमिकेची ओळख प्रेक्षकांना होते. हा सिनेमा २८ ऑगस्टला डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये

संजय दत्तच्या आयुष्यातील सर्वांत प्रिय व्यक्तीचा (पूजा भट्ट) चा मृत्यू होतो आणि त्यानंतर त्याचा जगण्यातला रस निघून जातो. अशातच त्याच्या आयुष्यात आर्या म्हणजेच आलिया भट्ट येते. संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर मिळून कैलाश पर्वतावर जाण्यासाठी तयार होतात आणि या प्रवासात काय घडतं याची कथा चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या चित्रपटात अभिनेते मकरंद देशपांडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने महेभ भट्ट यांनी तब्बल २१ वर्षांनंतर दिग्दर्शन केलं आहे. ट्रेलरमध्ये आलिया-आदित्यची लव्ह केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. प्रेम, रोमांन्स आणि अॅक्शनने भरपूर असा हा चित्रपट असल्याचे ट्रेलरवरुन लक्षात येत आहे.

सडक या सिनेमानं कमालीची लोकप्रियता मिळवली होती. त्या सिनेमात पूजा भट्ट, संजय दत्त, सदाशिव अमरापूरकर यांच्या भूमिका होत्या. सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेली महाराणी कमालीची हिट ठरली होती. आता सडक २ मध्ये महाराणीसारख्याच असणाऱ्या पात्राच्या भूमिकेत मराठमोठा मकरंद देशपांडे दिसून येत आहे.

दुसरीकडे या चित्रपटाला नेटकऱ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. पहिल्या पोस्टरपासूनच सडक २ वादात सापडला होता. पहिल्या पोस्टरवरून काही लोकांनी कोर्टात धावही घेतली होती. हिंदू लोकांच्या भावना दुखावल्याचा ठपका यावर ठेवण्यात आला होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर महेश भट्ट फार चर्चेत आले आहेत. ‘सडक २’ या चित्रपटातील भूमिकेची ऑफर आधी सुशांतली देण्यात आली होती अशी चर्चा होती. मात्र महेश भट्ट यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याला ती भूमिका दिलीच नव्हती हे स्पष्ट केलं.


हे ही वाचा – युरोप टूरमध्ये सुशांतला भयंकर चित्र दिसलं आणि त्याची तब्येत बिघडू लागली, रियाने केले धक्कादायक खुलासे!


First Published on: August 12, 2020 1:02 PM
Exit mobile version