Satish Kaushik Death : नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी, कारण…

Satish Kaushik Death : नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी, कारण…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे बुधवारी(8 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती. सतिश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सतीश कौशिक गुडगाव येथील एका फार्महाऊसवर गेले होते. तिथून परतत असताना त्यांना गाडीतच हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांचे पार्थिव दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात असून लवकरच मुंबईत आणले जाणार आहे. आज त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका असा परिवार आहे.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक किस्से समोर येत आहेत. सर्वांना खळखळून हसवणाऱ्या सतीश कौशिक यांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी देखील त्यांचे चाहते इच्छूक आहेत. असाच एक किस्सा अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याशी जोडलेला आहे.

प्रेग्नेंट नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी घातली लग्नाची मागणी

एकेकाळी सतीश कौशिक यांनी अभिनेत्री नीना गुप्ता यांना लग्नाची मागणी घातली होती. ज्यावेळी त्या लग्नाआधीच प्रेग्नेंट होत्या. नीना गुप्ता यांनी त्यांच्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्राच्या लॉन्चिंगदरम्यान हा किस्सा शेअर केला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “सतीश त्यांच्या मुलाला दत्तक घेण्यास देखील तयार होते. शिवाय ते म्हणाले की, जर हे मुल सावळं झालं तर ते माझं आहे असं सर्वांना सांगू शकतेस आहे आणि आपण लग्न करु याबाबत कोणाला कळणार देखील नाही.” मात्र, या सगळ्यासाठी नीना यांनी सतीश यांना नकार दिला आणि स्वतः आपली मुलगी मसाबाला सांभाळले. सतीश कौशित आणि नीना गुप्ता चांगले मित्र होते.

100 हून अधिक चित्रपटांमध्ये केले होते

1983 मध्ये आलेल्या ‘मासूम’ या चित्रपटातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याला दिग्दर्शनात हात आजमावण्याची संधी मिळाली आणि ‘जाने भी यारों’ या कल्ट चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. सतीश कौशिक ‘रूप की रानी चोरों का राजा’चे दिग्दर्शक होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच 1987 मध्ये मिस्टर इंडिया या चित्रपटातून त्यांना अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळाली.


हेही वाचा :

सर्वांना हसवणाऱ्या सतीश कौशिक यांच्या आयुष्यात होतं ‘हे’ मोठ्ठं दुःख

First Published on: March 9, 2023 11:28 AM
Exit mobile version