शाहरुख खानचा शर्टलेस हॉट अंदाज सोशल मीडियावर होतोय व्हायरल

शाहरुख खानचा शर्टलेस हॉट अंदाज सोशल मीडियावर होतोय व्हायरल

शाहरुख खानचा शर्टलेस हॉट अंदाज सोशल मीडियावर होतोय व्हायरल

बॉलिवूड बादशाह शाहरुख खानने  (Shah Rukh Khan)  अभिनय कौशल्येच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या हटके तसेच रोमँटींक अंदाजाने शाहरुख आज अनेक तरुण तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. एका छोट्याश्या टेलिव्हिजन मालिकेमधून आपल्या सिनेसृष्टीतील करियरला सुरुवात करणारा शाहरुख आज किंग खान म्हणून ओळखला जातो. शाहरुख सोशल मीडियावर फारसा ॲक्टीव नसतो. पण त्याने केलेल्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा भरभरुन वर्षाव करतात. नुकतच शाहरुखने शर्टलेस फोटोशूट केलं आहे. शाहरुखचा हा अंदाज पाहून प्रत्येकजण त्याच्यावर घायाळ झाले आहे. शाहरुख फोटोमद्ये अगदी फिट ॲन्ड हॉट दिसत आहे.

शर्टलेस फोटो पाहून चाहते झाले घायाळ-

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीने नुकतच शाहरुख खान सोबत फोटोशूट केलं आहे. शाहरुखचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच तूफान व्हायरल झाला आहे. या ब्लॅक ॲन्ड व्हाइट फोटोमध्ये शाहरुख शर्टलेस अंदाजात बॉडि फ्लॉन्ट करत आहे. शाहरुखच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत लिहले आहे की, ’55 वर्षाच्या वयातही शाहरुखने शरिर चांगलेचं मेंनटेन ठेवलं आहे.’ तसेच डब्बू रतनानी यांनी फोटो शेअर करत ‘एकदा तुम्ही निडर झालात की आयुष्य अमर्यादीत बनते’ असे कॅप्शन दिले आहे.

फोटो पाहा- 

नुकतच शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. शाहरुख अनेक कलाकारांसाठी आदर्श ठरला आहे. मात्र शाहरुखला सिनेसृष्टीत येण्यासाठी कोणताही गॉडफादर नव्हता. त्याने स्वत:च्या जिवावर आज बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमावले आहे.


हे हि वाचा – वियान कुंद्राचे आई शिल्पावर आहे प्रचंड प्रेम, राज कुंद्राच्या अटकेनंतर शेअर केले आईसोबतचे फोटो

First Published on: August 4, 2021 9:07 AM
Exit mobile version