वियान कुंद्राचे आई शिल्पावर आहे प्रचंड प्रेम, राज कुंद्राच्या अटकेनंतर शेअर केले आईसोबतचे फोटो

वियानच्या इंन्स्टाग्राम प्रोफाइलवर गेले असता वियानचे वडिल राज कुंद्रा आणि आई शिल्पा सोबतचे अनेक फोटो पहायला मिळतात.

Raj kundra son Vian Kundra share Photos on instagram with mother shilpa shetty after Raj Kundra arrest
वियान कुंद्राचे आई शिल्पावर आहे प्रचंड प्रेम, राज कुंद्राच्या अटकेनंतर शेअर केले आईसोबतचे फोटो

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) आणि तिचे कुटुंब सध्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. राज कुंद्राच्या (Raj kundra )अटकेनंतर शिल्पावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. शिल्पा या विषयी अनेकदा स्टेटमेंट देत राज कुंद्राचा या प्रकरणासी काही संबंध नसल्याचे सांगितले आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर १४ दिवसांनी शिल्पाने एक स्टेटमेंट जारी करत आमच्या कुटुंबाच्या गोपनियतेचा आदर राखण्याची विनंती केली आहे. शिल्पा नंतर आता तिचा मुलगा वियान कुंद्रा (Viaan Kundra)  याने देखील शिल्पा सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. राज कुंद्राच्या अटकेचा वियानवर देखील परिणाम झाला आहे. वियानने आई शिल्पाला मिठी मारलेले, तिच्या सोबत निवांत घालवलेल्या क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. वियानने या फोटोंना कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. या फोटोंवरुन वियानचे आई शिल्पावर किती प्रेम आहे हे दिसून आले.(Raj kundra son Viaan Kundra share Photos on instagram with mother shilpa shetty after Raj Kundra arrest)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viaan Raj Kundra (@viaanrajkundra)

वियानने केवळ आई शिल्पा सोबतचे फोटोच इंन्स्टाग्राम शेअर केले नाही तर शिल्पाने जारी केलेले स्टेटमेंटही त्याने त्याच्या इंन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहे. वियान किती समजूतदार आहे हे त्यांच्या या वागण्यातून समोर आले आहे. सध्या वियानच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा केली जात आहे. वियानने केवळ आई शिल्पा सोबतच फोटो शेअर का केले? असे प्रश्न देखील नेटकरी विचारत आहेत. वियानच्या इंन्स्टाग्राम प्रोफाइलवर गेले असता वियानचे वडिल राज कुंद्रा आणि आई शिल्पा सोबतचे अनेक फोटो पहायला मिळतात.

२ ऑगस्ट रोजी शिल्पाने शेट्टी एक स्टेटमेंट जारी केले त्यात तिने असे म्हटले होते की, मागचे काही दिवस आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. अनेक आरोप आणि अफवा पसरवल्या जात आहेत. माध्यमांनी माझ्याविषयी अनेक अनावश्क गोष्टी प्रसारित केल्या. माझे संपूर्ण कुटुंब या गोष्टीमुळे ट्रोल झाले. मी याबाबत अजून कोणतीही गोष्ट बोलले नाही. मी हे करणे टाळत आहे कारण सगळे न्यायालयीन आहे. माझे नाव घेऊन कोणताही चुकीची माहिती पसरवू नका असे तीने स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा – ‘तु खूप स्ट्राँग आहेस’, शिल्पाच्या बाजूने उभा राहिला आर माधवन