चित्रपट तयार करणाऱ्यांना देखील स्वातंत्र्य आहे… ‘हर हर महादेव’च्या विरोधकांवर शरद पोंक्षे संतापले

चित्रपट तयार करणाऱ्यांना देखील स्वातंत्र्य आहे… ‘हर हर महादेव’च्या विरोधकांवर शरद पोंक्षे संतापले

सध्या संपूर्ण राज्याभरात ‘हर हर महादेव’ चित्रपटामुळे एकच वाद निर्माण झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या मते, या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला इतिहास चुकूचा असून या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची फसवणूक केली जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका सभेमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटाला विरोध केला दरम्यान, त्यानंतर राष्ट्रवादीनेही त्यांना पाठिंबा दिला असून चित्रपटावर तीव्र निषेध नोंदवला आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे, पुणे आणि नाशिकमधील अनेक चित्रपटगृहांमध्ये जाऊन या चित्रपटाचे शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेने या चित्रपटाला पाठिंबा देत हे शो पुन्हा सुरु करण्यास सांगितले. दरम्यान, आता या सर्व प्रकरणावर राजकीय नेत्यांसोबतच कलाकारही संताप व्यक्त करत आहेत.

मराठमोठे अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध करण्यांना चांगलेच सुनावले आहे. याबाबत ते म्हणाले की, “सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला संमती दिली आहे. शासनाने तिथे हुशार माणसं नेमली आहेत. तसेच चित्रपटातील इतिहास कोणत्या प्रसंगावर आधारित आहे याचे पुरावे दिग्दर्शकांनी दिले आहेत. मात्र, हे चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाल्यानंतरच यांना कसं सुचलं? चित्रपट सुरु असताना प्रेक्षकांना मारुन बाहेर काढणं किती योग्य आहे? या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तसेच चित्रपट तयार करणाऱ्यांना देखील आहे.” दरम्यान, या प्रकरणी ते संभाजीराजे छत्रपती यांची देखील भेट घेणार आहेत.

 


हेही वाचा :

शिवरायांचे भक्त म्हणवता मग हे वागणं शोभतं का? ‘हर हर महादेव’च्या दिग्दर्शकाचा संताप

First Published on: November 10, 2022 1:41 PM
Exit mobile version