घरमनोरंजनशिवरायांचे भक्त म्हणवता मग हे वागणं शोभतं का? 'हर हर महादेव'च्या दिग्दर्शकाचा...

शिवरायांचे भक्त म्हणवता मग हे वागणं शोभतं का? ‘हर हर महादेव’च्या दिग्दर्शकाचा संताप

Subscribe

चित्रपटातर्फे आम्ही आज संध्याकाळ पर्यंत एक अधुकृत पत्रक जारी करणार आहोत त्यामध्ये त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर मिळतिल.

हर हर महादेव चित्रपटात चुकीचे संदर्भ दाखविल्याने एकाच वादंग निर्माण झाला आहे. यामुळे राजकारण सुद्धा चांगलच तापलं आहे. अशातच हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.

अभिजित देशपांडे पत्रकार परिषदेत म्हणाले, चित्रपटासंदर्भातील सर्व ऐतिहासिक दस्तावेज आम्ही आधीच सेन्सॉर बोर्डाला सादर केले होते. हे पुरावे सादर केल्यानंतरच आम्हाला प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यामुळे आम्हाला याबद्दल काही बोलायचं नाही. पण काल चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यसाठी गेलेल्या मराठी प्रेक्षकांना काही लोकांनी मारहाण करत अपशब्द वापरले हा अत्यंत लांछनास्पद प्रकार आहे आणि म्हणूनच मी समोर येऊन आमची भूमिका मांडत आहे. असंही हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे म्हणाले.

- Advertisement -

आपण स्वतःला छत्रपत्री शिवाजी महाराजांचे भक्त म्हणवतो पण त्यांचेच विचार समजून न घेता एकमेकांवर हल्ले आणि शिवीगाळ करत असू तर मग आपल्याला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेव्याचा आहे असं म्हणत अभिजित देशपांडे यांनी संताप व्यक्त केला.

चित्रपटातर्फे आम्ही आज संध्याकाळ पर्यंत एक अधुकृत पत्रक जारी करणार आहोत त्यामध्ये त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर मिळतिल. पण चित्रपटाची ज्या मुद्यांवर आक्षेप घेण्यात येत आहे, त्यावरचे ऐतिहासिक दस्तावेज आणि कागदपत्र तर आम्ही सेन्सॉर ला आधीच पाठवले होते. त्यात अनेक तज्ञ मंडळी असतात यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सर्व पुरावे आधीच सादर केले आहे आणि त्या नंतरच आम्हाला चित्रपटासाठी प्रमाणपत्र देण्यात आले. सेन्सॉर प्रमाणपत्र हे याच गोष्टीच प्रमाण आहे की आम्ही आमच्या बाजूने कोणतीच कसर सोडली नाही. सर्व कागदपत्रे सादर केली आहेत.

- Advertisement -

 

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यामधील लढाईने वादंग

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यामधील लढाईने वादंग निर्माण झाला आणि याच मुद्यावर वाद निर्माण झाला त्यावर अभिजित देशपांडे म्हणाले, मला यावर कोणत्याही प्रकारचे राजकीय वक्तव्य करायचे नाही. हाच प्रश्न आम्हाला सेन्सॉर बोर्डाने देखील विचारला पण आपल्याला जेवढा इतिहास वाटतो तेवढाच तो नसतो, अनेक बखरींचा अभ्यास करतो, तज्ज्ञांशी बोलतो, इतिहास करांशी बोलतो तेव्हा किंवा पुस्तकांमधून इतिहासासंदर्भांत अनेक संदर्भ कळतात.

जर का तुम्हाला कोणते मुद्दे पटले नसतील तर तुम्ही कोर्टात बोला. पण चित्रपटगृहात जाऊन असे वागणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वाना माणुसकीचा संदेश दिला आणि हे असं वागून महाराजांचं अपमान करत आहोत आणि ते चुकीचे आहे. असं हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे म्हणाले.


हे ही वाचा –  ठाकरे गटाला मोठा धक्का, विदर्भातील युवासेनेचे सात जिल्हाप्रमुख शिंदे गटात

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -