Video : शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याने मोलकरणीला केली किस

Video : शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याने मोलकरणीला केली किस

Video : शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याने मोलकरणीला केली किस

कोरोना व्हायरसमुळे बॉलिवूड कलाकारही आपआपल्या घरात बंद आहेत. पण, सोशल मीडियावर मात्र, बॉलिवूड कलाकार चांगलेच active झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कित्येक जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. तर काही जण टिक -टॉकवर आपला वेळ घालवताना दिसत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील मागे नाही. ती दररोज नवनवीन टिक – टॉक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. विशेष म्हणजे हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी शिल्पाने पतीला शेजारच्या व्यक्तीला करोना झाल्याचे सांगतानाचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता शिल्पा शेट्टीने आणखी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, शिल्पा अनेकदा तिचे टिक-टॉक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. तसेच तिच्या बऱ्याच व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिचा पती राज कुंद्रा देखील असल्याचे पाहायला मिळत आहे.

काय आहे या व्हिडीओत?

शिल्पा शेट्टीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शिल्पा कामात असल्याचे दिसून येत आहे. ती आपले कपडे कपाटात लावत आहे. मात्र, त्याच दरम्यान शिल्पाचा पती राज कुंद्रा तिला किस करण्याचा प्रयत्न करतो. त्यावर शिल्पा म्हणते, ‘काम करते वेळी किस करु नकोस’. त्यावर त्यांच्या घरातील घरकाम करणारी मोलकरीण म्हणते, ‘मॅडम चांगल्या पद्धतीने समजवा. मी तर सांगून सांगून थकले आहे’. हे ऐकताच शिल्पाला शॉक बसतो आणि त्यानंतर ती आपल्या पतीची चांगलीच धुलाई करते. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला असून तो व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर देखील केला आहे.

First Published on: May 14, 2020 4:50 PM
Exit mobile version