दिल्लीच्या आमदाराकडून शाहरुख खानविरोधात फौजदारी खटला दाखल

दिल्लीच्या आमदाराकडून शाहरुख खानविरोधात फौजदारी खटला दाखल

शाहरुख खानचा 'झिरो' चित्रपट वादात अडकण्याची शक्यता

दिल्लीतील अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. शाहरुखचा झिरो हा सिनेमा २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र, या सिनेमामध्ये शिख समाजाच्या भावना दुखावल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या आमदाराने शाहरुख खानसह सिनेमासंबंधी इतर लोकांवर पंजाबमधील सिरसा येथे हा खटला दाखल केला आहे.

झिरो चित्रपटावर सिख समुदाय नाराज 

शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपटाच्या पोस्टरवर शीख समुदाय नाराज झाला आहे. त्या पोस्टरमध्ये शाहरुखने कृपाण धारण केले आहे. शाहरुखच्या गळ्यात नोटांचा हार आणि कृपाण आहे. यावर शीख बांधवांनी आक्षेप घेतला आहे. शीख बांधवांना ज्या पाच वस्तू अनिवार्यपणे धारण करायचे असतात, त्यातील कृपान हे महत्वाचे आहे. शीख बांधव कृपानला वीरता आणि धाडसाचे प्रतिक मानतात. त्यामुळे ‘झिरो’ चित्रपटाच्या पोस्टरवर शाहरुखने धारण केलेल्या कृपाणवर शीख समुदायाने विरोध केला आहे.

हेही वाचा – ‘झिरो’मधून झळकणार दोन ‘हिरो’, टीझर लाँच

‘झिरो’च्या निर्मात्यांकडे पोस्टर मागे घेण्याची मागणी

‘झिरो’च्या पोस्टरवर दिल्ली शीख गुरद्वार प्रबंधक समितीच्या धर्मप्रसार समितीचे अध्यक्ष परमजीत सिंह राणा यांनी आपला निषेध नोंदवला आहे. कृपानसोबत शीर समुदायाच्या भावना जुळलेल्या आहेत. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी हे पोस्टर ताबडतोड मागे घ्यावे, तसेच कृपाणशी संबंधित वादग्रस्त सिन्स टाळावे असे निर्देश राणा यांनी दिले आहेत. शिवाय, असे न झाल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात दिल्ली शीख गुरद्वार प्रबंधक समितीकडून शाहरुख खानला आणि चित्रपट निर्मात्यांना लवकरच नोटीस पाठवली जाणार आहे.

हेही वाचा – ‘झिरो’ चित्रपट हीट ठरण्यासाठी सलमान करणार प्रमोशन

शाहरुखच्या वाढदिवशी चित्रपटाचा ट्रेलर लॉंच

शाहरुख खानच्या वाढदिवशी म्हणजेच २ नोव्हेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला. २१ डिसंबर २०१८ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान सोबत सलमान खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ, काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकाण आणि आलिया भट्ट दिसणार आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री श्रीदेवी देखील या चित्रपटातील एका गाण्यात दिसणार आहे.


हेही वाचा – ‘झिरो’च्या पोस्टरवर नायिकांचा अनोखा अंदाज

First Published on: November 5, 2018 4:10 PM
Exit mobile version