लवकरच आदित्य नारायण मंदिरात उरकणार लग्न

लवकरच आदित्य नारायण मंदिरात उरकणार लग्न

लवकरच आदित्य नारायण मंदिरात उरकणार लग्न

‘इंडियन आयडल सीझन १२’चे सूचसंचालन करणारा आणि गायक आदित्य नारायण १ डिसेंबरला बोहल्यावर चढणार आहे. लाँग टाईम गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला आदित्य नारायण सुरुवात करणार आहे. आतापासूनच लग्नाच्या विधीला सुरुवात झाली आहे. २८ नोव्हेंबरला आदित्य आणि श्वेताचा साखरपुडा (तिलक सेरेमनी) पार पाडली. ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये आदित्य आणि श्वेता स्टेजवर बसलेले दिसत आहेत. यादरम्यान आदित्यचे वडील आणि बॉलिवूड गायक उदित नारायण आणि त्यांची पत्नी दीपा नारायण झा स्टेज उपस्थित आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आदित्य आपल्या घरच्या काही महिलांसोबत डान्स करताना दिसत आहे.

First Published on: November 29, 2020 3:46 PM
Exit mobile version