VIDEO: सोनाली बेंद्रेने शेअर केला उपचारानंतरचा मेकओवर लूक

VIDEO: सोनाली बेंद्रेने शेअर केला उपचारानंतरचा मेकओवर लूक

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली खूप भावनिक होताना दिसत आहे. ज्यावेळी सोनालीला कर्करोगाने ग्रासले होते त्यावेळी तिने प्रत्येक क्षण तिच्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर करत आली आहे. सध्या तिने सोशल मीडियावर आपला मेकओवर केलेला लूक शेअर केला आहे.

कर्करोगाच्या विळख्यात सापडलेली सोनाली आजारा दरम्यान बिना केसांची दिसली होती. कीमोथेरेपी सुरू असताना तिचे सगळे केस गेले होते. परंतु, नुकताच तिने आपला मेकओवर झाल्यानंतर तिने आपले फोटो कॅमेऱ्यात कैद देखील केले होते.

या व्हिडीओमध्ये तिने सांगितले की, आजाराच्या सुरूवातीला हेअरकट केला होता. परंतु हे केस कापतांना कोणतेही दुखः झाले नाही. कारण केसांपेक्षा आयुष्य महत्त्वाचे आहे, असे यावेळी तिने सांगितले.

First Published on: May 30, 2019 2:22 PM
Exit mobile version