RRR Postponed: कोरोनामुळे आरआरआरच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली

RRR Postponed: कोरोनामुळे आरआरआरच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली

एसएस राजामौली यांचा बिग बजेट आरआरआर (RRR)  या साऊथ इंडियन सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ( RRR movie release date Postponed )   ७ जानेवारीला सिनेमा सिनेमागृहात रिलीज होणार होता. मात्र देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. या आधी हा सिनेमा ३० जुलै २०२० साली प्रदर्शित होणार होता मात्र सिनेमावर कोरोनाचे सावट आल्याने सिनेमा लांबणीवर पडला. आता परिस्थिती सुधारल्याने सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला होता मात्र पुन्हा एकदा कोरोनामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख लवकरच घोषित करण्यात येणार आहे.

आरआरआर या सिनेमाची प्रेक्षक अनेक दिवस आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमात राम चरण ( Ram Charan )  आणि ज्युनिअर एनटीआर  (Jr NTR) हे प्रमुख कलाकार आहेत. त्याचप्रमाणे सिनेमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan )  आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) देखील दिसणार आहेत. हा सिनेमा तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहेत. नुकताच रिलीज झालेल्या पुष्पा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. नव्या वर्षात आरआरआर या सिनेमाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या प्रेक्षकही सिनेमा पाहण्यासाठी आतूर होते मात्र सिनेमाचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

बहुप्रतिक्षित आरआरआर सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच प्रेक्षकांच्या हाती निराशा आली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. सिनेमाचा ट्रेलर २०२१ मध्ये रिलीज झाला होता. ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या सिनेमाप्रती असलेल्या आपेक्षा आणखी वाढल्या होत्या. हा सिनेमा बाहुबलीला टक्कर देईल असे म्हटले जात होते. सिनेमाचं एकूण बजेट तब्बल ३५० – ४०० करोड रुपये आहे.

ब्रिटिश राजवटीच्या काळातील दोन स्वातंत्र्यसैनिकांची कथा सिनेमात दाखवण्यात येणार आहे. स्वातंत्रसैनिक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या जीवनावर आधारित ही काल्पनिक कथा आहे.सिनेमात अल्लूरी सीताराम रााजू यांची भूमिका अभिनेता राम चरण याने साकारणार आहे तर कोमाराम भीमची भूमिका ज्युनिअर एनटीआरने साकारणा आहे.


हेही वाचा – RRR Trailer: बहुप्रतिक्षित आरआरआर सिनेमाचा ट्रेलर आउट, काय आहे सिनेमातील कास्ट? कधी होणार रिलीज? जाणून घ्या

First Published on: January 1, 2022 5:02 PM
Exit mobile version