घरताज्या घडामोडीRRR Trailer: बहुप्रतिक्षित आरआरआर सिनेमाचा ट्रेलर आउट, काय आहे सिनेमातील कास्ट? कधी...

RRR Trailer: बहुप्रतिक्षित आरआरआर सिनेमाचा ट्रेलर आउट, काय आहे सिनेमातील कास्ट? कधी होणार रिलीज? जाणून घ्या

Subscribe

बाहुबलीपेक्षा मोठा आणि तगडा सिनेमा असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहे.

एस.एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित आरआरआर या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आरआरआर म्हणजेच ‘राइज रोर अँड रिवोल्ट’. तगडी स्टार कास्ट असलेल्या या सिनेमाची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. ब्रिटिश राजवटीच्या काळातील  दोन स्वातंत्र्यसैनिकांची कथा सिनेमात दाखवण्यात येणार आहे. स्वातंत्रसैनिक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या जीवनावर आधारित ही काल्पनिक कथा आहे. आरआरआर हा सिनेमा ७ जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेता राम चरण, त्याचबरोबर ज्युनिअर एनटीआर सह बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण या सिनेमात मुख्य भुमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अलिया भट्टही या सिनेमात मुख्य नायिकेचे पात्र साकारणार आहे. अनेक महिने प्रतिक्षित असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नक्की कसा आहे पाहूयात.

३ मिनिटे १५ सेंकदाचा हा ट्रेलर संपूर्ण अँक्शनने भरलेला आहे. अनेक जबरदस्त VAX इफेक्ट्स ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहेत. सिनेमात अल्लूरी सीताराम रााजू यांची भूमिका अभिनेता राम चरण याने साकारली आहे तर कोमाराम भीमची भूमिका ज्युनिअर एनटीआरने साकारली आहे. ट्रेलरमध्ये अल्लूरी आणि कोमाराम यांची मैत्री फार सुंदररित्या मांडण्यात आलीय. सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी सिनेमाची तुलना थेट बाहुबली सिनेमाशी केली आहे. बाहुबलीपेक्षा मोठा आणि तगडा सिनेमा असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहे. सिनेमाचं एकूण बजेट तब्बल ३५० – ४०० करोड रुपये आहे.

- Advertisement -

आरआरआर सिनेमाची कहाणी १९२०मधल्या अल्लूरी आणि कोमाराम यांची आहे. ट्रेलरमध्ये अल्लूरी आणि कोमाराम यांच्या ब्रिटीश सरकार आणि हैद्राबाद निजामांविरोधात सुरू असलेली लढाई दाखवण्यात आली आहे. अल्लूरी आणि कोमाराम आधी एकमेकांचे दुष्मन दाखवलेत पण पुढे जाऊन ते एकमेकांचे फार जवळचे मित्र होतात.+

ट्रेलरच्या सुरूवातील एक माणूस सांगतोय गव्हरमेंट स्कॉट जेव्हा आपल्या फॅमिलीसोबत आदिलाबाद आले तेव्हा एका लहान मुलीला घेऊन आले होते. देशाच्या आझादीसाठी लढणाऱ्या एका संघातील ती मुलगी होती त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचं योगदान दिलं होतं. नंतर जंगलातून पळणारा ज्युनिअर एनटीआरची एंट्री होते आणि तो थेट वाघाच्या तोंडाजवळ जाऊन उभा राहतो. पुढे तो म्हणतो ‘शेर को पडकने के शिकारी चाहिये होता है’ आणि पोलिसांच्या वेशात अभिनेता राम चरण दमदार एंट्री होते. त्यानंतर अजय देवगण,आलिया भट्ट यांचे लुक समोर येतात.

- Advertisement -

अजय देवगण आणि आलिया भट्ट यांचे फार कमी लुक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. आलिया यात सीता नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांचा ट्रेलरमधील लुकने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. दोघांचा लुक फारच प्रॉमिसिंग वाटतो आहे. सिनेमा तेलगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. त्याचबरोबर हिंदी आणि इतर भाषेतही पहायला मिळणार आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये एक्शन,इमोशन आणि देशभक्ती फार उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे. सिनेमात ज्युनिअर एनटीआर,रामचरण, अजय देवगण,आलिया भट्ट,श्रिया सरन,रे स्टीवेन्सन,एलिसन डूडी देखील दिसणार आहेत. सिनेमाची कहाणी विजयेद्र प्रसाद यांनी लिहिली आहे.

 


हेही वाचा – Katrina-vicky Kaushal Wedding: लग्नाचा ७५ टक्के खर्च कतरिनाच्या डोक्यावर, एकटीच घेतेय सगळे निर्णय

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -