अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला समन्स; २६सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला समन्स; २६सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश

पटियाला हाऊस कोर्टाने बुधवारी सुकेश चंद्रशेखरशी(sukesh chandrashekhar) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडचणीत आलेली बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविरुद्ध(Jacqueline Fernandez) दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आहे.पटियाला कोर्टाने जॅकलीन फर्नांडिसला समन्स बजावून 26 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले. यासोबतच न्यायालयाने ईडीला आरोपपत्राची प्रत जॅकलिनच्या वकिलाला देण्याचे निर्देशसुद्धा दिले आहेत.

हे ही वाचा – ‘Jacqueline Fernandez’सोबत प्रायवेट फोटो लीक झाल्यावर आरोपी सुकेश चंद्रशेखर झाला नाराज, म्हणाला…

अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वीच सुकेश चंद्रशेखर(sukesh chandrashekhar) यांच्याविरुद्ध 2 आरोपपत्र दाखल केली आहेत. या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर याच्यासह सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पटियाला हाऊस कोर्टात हजर झाले होते. त्याचवेळी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने(Jacqueline Fernandez) एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी पोलंडला जाण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती. जॅकलिनची ही परवानगी कोर्टाने फेटाळून लावली. यापूर्वीहि ईडीने जॅकलिन फर्नांडिसची 7 कोटी 27 लाख रुपयांची संपत्ती जप्त केली होती याशिवाय सुकेशने जॅकलिनला मौल्यवान भेटवस्तू आणि त्या सोबतच रोख रक्कम 7.7 कोटी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हे ही वाचा – Money Laundering Case : Jacqueline ला पश्चातापाची वेळ! सुकेश प्रकरणामुळे गमावला ‘हा’ बिग बजेट सिनेमा

दरम्यान, ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, तपासादरम्यान असे समोर आले आहे की सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कारवायांच्या कमाईतून जॅकलिन फर्नांडिसला(Jacqueline Fernandez) 5.71 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. या प्रकरणातील आरोपी पिंकी इराणी या सुकेश चंद्रशेखरने त्याच्या सहकारी आणि आरोपी पिंकी इराणी यांच्यामार्फत या भेटवस्तू जॅकलिनला दिल्या होत्या. सुकेश चंद्रशेखर(sukesh chandrashekhar) यांनी आंतरराष्ट्रीय हवाला ऑपरेटर अवतार सिंग कोचर याच्यामार्फत जॅकलिन फर्नांडिसच्या कुटुंबीयांना USD 1,72,913 आणि USD 2,67,40 दिले होते.

हे ही वाचा – Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आर्थिक संकटादरम्यान Jacqueline Fernandez म्हणाली, ‘माझ्या देशातील लोकांना पाठिंब्याची गरज’

 

First Published on: August 31, 2022 4:20 PM
Exit mobile version