Money Laundering Case : Jacqueline ला पश्चातापाची वेळ! सुकेश प्रकरणामुळे गमावला ‘हा’ बिग बजेट सिनेमा

द घोस्ट हा सिनेमा जरी जॅकलिनच्या हातून गेला असला तरी येत्या काळात जॅकलीन प किक २, राम सेतू, बच्चन पांडे आणि सर्कसमध्ये दिसणार आहे.

Jacqueline fernandez out from nagarjuna movie the ghost due toMoney Laundering Case
Money Laundering Case : Jacqueline ला पश्चातापाची वेळ! सुकेश प्रकरणामुळे गमावला 'हा' बिग बजेट सिनेमा

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline fernandez)  सध्या २०० करोडच्या खंडणी प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आहे. बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखरमुळे ( Sukesh chandrashekhar)  जॅकलिनवर पश्चाताप करण्याची वेळआली आहे. कारण जॅकलिनच्या या प्रकरणामुळे  तिच्या नावावर असलेला एक बिग बजेट साऊथ इंडियन सिनेमा तिला सोडावा लागला आहे. अनेक दिवसांपासून द घोस्ट (the ghost ) हा सिनेमा देखील चर्चेत आहे. या सिनेमातून जॅकलिन नागा चैतन्य सोबत झळकणार होती. मात्र सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण सत्तारु यांनी सिनेमातून जॅकलिनला काढून टाकले आहे. सुकेश चंद्रशेखर खंडणी प्रकरणामुळे जॅकलिनला १००कोटींच्या इतक्या मोठा बिग बजेट सिनेमातून काढून टाकण्यात आले असे सांगितले जात आहे.

नागार्जुनच्या द घोस्ट या सिनेमाच्या कास्टमध्ये अनेक अडथळे आले. काहि महिन्याआधी अभिनेत्री काजल अग्रवाल सिनेमात काम करणार होती मात्र तिच्या प्रेग्नंसीमुळे तिला सिनेमा सोडावा लागला. त्यानंतर अमाला पॉल आणि महरीन कौर पीरजादाला विचारण्यात आले मात्र त्यांचे फीस चार्ज न परवडणारे असल्याचे निर्मात्यांनी नाही म्हटले. त्यानंतर जॅकलिनला सिनेमासाठी विचारण्यात आले. मात्र आता जॅकलिनला देखील निर्मात्यांनी नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलीन आता द घोस्ट या सिनेमाचा कोणताही हिस्सा नाही. जॅकलिनला सिनेमातून काढण्याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी वसूलू प्रकरणात जॅकलीनचे नाव आल्याने निर्मात्यांनी जॅकलिनला रिजेक्ट केल्याचे सांगितले जात आहे. जॅकलिनला काढल्यानंतर निर्माते सिनेमाच्या नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत.

साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा अपकमिंग सिनेमा बंगाराजूची चर्चा होती. नागार्जुन आपला मुलगा नागा चैत्यन्य सोबत या सिनेमात दिसणार आहे. बंगाराजू हा सिनेमा १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

द घोस्ट हा सिनेमा जरी जॅकलिनच्या हातून गेला असला तरी येत्या काळात जॅकलीन प किक २, राम सेतू, बच्चन पांडे आणि सर्कसमध्ये दिसणार आहे.


हेही वाचा – मानेवर Love Bite गालावर किस, Jacqueline – Sukeshचा नवीन फोटो लीक