घरताज्या घडामोडी'Jacqueline Fernandez'सोबत प्रायवेट फोटो लीक झाल्यावर आरोपी सुकेश चंद्रशेखर झाला नाराज, म्हणाला...

‘Jacqueline Fernandez’सोबत प्रायवेट फोटो लीक झाल्यावर आरोपी सुकेश चंद्रशेखर झाला नाराज, म्हणाला…

Subscribe

जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) मागील काही दिवसांपासून चित्रपटांमुळे नाही तर, गजाआड असणाऱ्या आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत असणाऱ्या नात्यामुळे ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. जॅकलीनसोबतच्या लीक झालेल्या प्रायवेट फोटोमुळे आरोपी सुकेश खूप नाराज झाला आहे.

जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) मागील काही दिवसांपासून चित्रपटांमुळे नाही तर, गजाआड असणाऱ्या आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत असणाऱ्या नात्यामुळे ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. जॅकलीनसोबतच्या लीक झालेल्या प्रायवेट फोटोमुळे आरोपी सुकेश खूप नाराज झाला आहे. गुरुवारी 3 फेब्रुवारीला या प्रकरणाबाबत सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने एक नोट लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने जॅकलिनला वाचवत या केसशी तिचे काहीच घेणे-देणे नाही,असे म्हटले आहे. सुकेशने पत्रात लिहिले, ‘मी माझे खाजगी फोटो पाहिले, जे सोशलमिडियावर व्हायरल झाल्यामुळे मी खूप नाराज आहे. हे एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोपनीयतेचे उल्लंघन आहे. मी सर्वांना विनंती करतो की जॅकलीनबाबत चुकीची समजूत करून घेऊ नका. कारण तिच्यासाठी हे सहन करण खूप कठीण आहे. अशारितीने सुकेश चंद्रशेखर यांनी त्यांच्या वकिलामार्फत मीडियाला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

जॅकलीन आणि मी पहिल्यापासून रिलेशनशिपमध्ये होते. आम्ही एकामेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहे. त्यामुळे आमचे प्रेम हे पैशासाठी नव्हते किंवा कोणत्याही पैशातून मिळणाऱ्या फायद्यासाठी नव्हता. जे काही ट्रोल केलं जात आहे ते फार चुकीचे आहे. तिने माझ्यावर कोणताही स्वार्थ न ठेवता प्रेम केले आहे. आमच्या रिलेशनशिपमध्ये खूप सारं प्रेम आणि सन्मान होता. ज्यामध्ये एकमेकांबाबत कोणतीही इच्छा आणि अपेक्षा नव्हती.आमचं प्रेम निरपेक्ष होतं.जॅकलीनचा माझ्या मनी लाँड्रिंग प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे मी आधीच सांगितले आहे. तिला घेतलेले सर्व गिफ्ट मी माझ्या मेहनतीच्या कमाईतून घेतले आहेत, असे त्याने लिहिले आहे.

- Advertisement -

सुकेशने शेवटी लिहिले की, ‘मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की आमच्या दोघांबाबत गैरसमज करणे थांबवा आणि कृपया जॅकलिनला प्रेम आणि पाठिंबा द्या कारण तिने काहीही चुकीचे केलेले नाही. कोणतीही आशा न ठेवता प्रेम करणे एवढेच तिने केले आहे.

म्हणून सुकेश आहे गजाआड 

200 कोटी खंडणी प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या सुकेशवर 7000 पानांच्या चार्टशीट दाखल करण्यात आले. ज्यात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे नाव होते. या केसमधील मास्टर माइंड कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरने 200 कोटी रुपयांमधील 10 करोड रुपये जॅकलीनवर खर्च केले. सुकेशने जॅकलीनला महागडे गिफ्ट्स दिले होते असे आरोप करण्यात आले आहेत. ज्यात लग्झरी गाड्या, 52 लाखांचा घोडा, चार पर्शियन मांजरी आणि अनेक महागड्या वस्तूंचा समावेश आहे.

- Advertisement -

हे ही वाचा –  मानेवर Love Bite गालावर किस, Jacqueline – Sukeshचा नवीन फोटो लीक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -