सुपरस्टार रजनीकांत यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

सुपरस्टार रजनीकांत यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

Dadasaheb Phalke Award: सुपस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार, आज होणार पुरस्काराने सन्मानित

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना शुक्रवारी ब्लड प्रेशरच्या कारणामुळे हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रजनीकांत यांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अपोलो रुग्णालयाने रजनीकांत यांच्या आरोग्याविषयी माहिती देताना सांगितले की, रजनीकांत यांना कोणतीही गंभीर समस्या नाही आहे.

डॉक्टरांकडून सल्ला दिला आहे की, सध्या रजनीकांत यांनी कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नये. त्यांना तणावमुक्त राहण्यास सांगितले आहे. तसेच त्यांना बाहेर कमीत कमी जाण्याचा सल्ला दिला आहे, कारण कोरोना व्हायरसचा धोका अद्यापही कायम आहे. रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत बोलायचे झाले तर रुग्णालयाकडून सांगितले गेले आहे की, आता त्यांचा बीपी नॉर्मल आहे आणि प्रकृती पहिल्यापेक्षा अधिक चांगली आहे. असे जरी असले तरी सर्व प्रकारची सावधनागिरी बाळगली पाहिजे. रजनीकांत यांच्या सातत्याने बीपी चेक केला जाईल. त्यांच्यासाठी एका आठवड्याचा आराम आवश्य असल्याचे सांगितले आहे.

यापूर्वी रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सर्व तपासणीचे अहवाल आले आहेत आणि यामध्ये चिंता करण्याची कोणतीही गोष्ट नाही आहे. आज दुपारी डॉक्टरांच्या टीमने रजनीकांत यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना कधी डिस्चार्ज द्यायचा याबाबत निर्णय घेतला गेला. दरम्यान रजनीकांत आगामी चित्रपट ‘अण्णात्थे’ (Annaatthe) चित्रपटाचे शूटिंग करत होते, त्यादरम्यान त्यांना ब्लड प्रेशरची समस्या जाणवली.


हेही वाचा – ‘मुन्ना भाई ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सर्किटने दिली गुड न्यूज!


 

First Published on: December 27, 2020 8:26 PM
Exit mobile version