स्वप्नील जोशी म्हणतो मुंबईची भाषा मराठीच, विषय कट

स्वप्नील जोशी म्हणतो मुंबईची भाषा मराठीच, विषय कट

स्वप्नील जोशी म्हणतो मुंबईची भाषा मराठी, विषय कट

सोनी सब टीव्हीवरील तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील वादावर आता मराठी सिनेमासृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत मुंबईची भाषा हिंदी म्हटले होते. यावर अभिनेता स्वप्नील जोशीने ट्वीट करत मुंबई, महाराष्ट्र आणि तमाम मराठी भाषिकांची माफी मागावी असे म्हटले आहे. दरम्यान, सर्वप्रथम मनसेने वाहिनीकडून माफीची मागणी केली होती. त्यानंतर या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी आपण सर्व भाषेंचा सन्मान करतो, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर आता मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने मुंबईची भाषा मराठीच, असे म्हटले आहे.

ट्वीटमध्ये नेमकं काय म्हणाला?

मुंबईची भाषा मराठी ! विषय कट !
अशी चूक होताच कामा नये ! आणि जर मनापासून वाटत असेल कि “चूक” झाली आहे, तर आपण मुंबई, महाराष्ट्र आणि तमाम मराठी भाषिकांची माफी मागितलीच पाहिजे ! अशा आशयाचे ट्वीट त्याने केले आहे. यामध्ये त्याने @sabtv या वाहिनीला टॅग केले आहे.
#म #निषेध #असितमोदी @MarathiBrain #TMKOC असे हॅशटॅग देखील त्याने वापरले आहेत.


हेही वाचा – मुंबईची भाषा हिंदी? जेठालाल बरळले

First Published on: March 3, 2020 9:15 PM
Exit mobile version