घरमनोरंजनमुंबईची भाषा हिंदी? चंपकलाल बरळले

मुंबईची भाषा हिंदी? चंपकलाल बरळले

Subscribe

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेच्या एका भागामध्ये जेठालाल यांनी मुंबईची भाषा हिंदी असे वक्तव्य केले. यावरून मनसेने आक्षेप घेतला असून मालिकेतील संबंधितांनी त्वरीत माफीनामा सादर करावा, अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच ट्वीटरवरही यावरून टिकास्त्र सोडले जाते आहे.

सोनी सब टीव्हीवरील ‘तारक मेहताचा उलटा चष्मा’ ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेचे मजेशीर पात्र जेठालालचे वडील बाबूजी यांच्या तोंडी ‘मुंबईची भाषा हिंदी’ असल्याचा संवाद दाखविण्यात आला आहे. या संवादावरून सोशल मीडियावर ताशेरे ओढले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आक्षेप घेतला असून सब टिव्हीने याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केला आहे. तसेच मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी ट्विटरवर ट्विट सुद्धा केले आहे.

- Advertisement -

‘महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे आणि मुंबई महाराष्ट्रात आहे म्हणून आपण आपल्या उलट्या चष्म्याने पाहत प्रसारित केलेल्या भागात हिंदी मुंबईची भाषा आहे त्याबद्दल त्वरीत माफीनामा सादर करावा, अन्यथा…’ अशा प्रकारचे ट्वीट अखिल चित्रे यांनी ट्विटर हँडलवर केले आहे.

- Advertisement -

भूषण बोत्रे या तरूणांने स्वतःच्या ट्वीटर हँडलवर मालिकेतील चित्रिकरण झालेल्या भागाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर त्याने ‘मुंबईची भाषा हिंदी?’ असे लिहिले आहे. तसेच लेखी सोबतच मालिकेत पात्रांच्या मुखातून देखील माफीनामा यायला हवा! असेही ट्वीट भूषण याने केले आहे.

याशिवाय भास्कर धसाडे याने ‘बरं झालं गुजराती नाही बोला…’, बिपिन यांनी ‘याच कार्यक्रमात अनेकदा हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा खोटा प्रचार यापूर्वी करण्यात आलेला आहे’, विशाल मेस्त्री याने ‘होय तो जेठालाल बऱ्याच वेळा बोलला असं…’ तसेच अभिजात मराठी यांनी ‘मालिकेत काम करत असलेल्या मराठी कलाकारांनी आक्षेप नाही घेतला, मान हलवत बसले’, अशा प्रकारच्या टीका ट्वीटरवर केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -