स्वरा भास्करने दिली गुड न्यूज; बेबी बंपसह शेअर केला फोटो

स्वरा भास्करने दिली गुड न्यूज; बेबी बंपसह शेअर केला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद मागील काही महिन्यांपूर्वी विवाह बंधनात अडकले. तेव्हापासून स्वरा भास्करच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. स्वरा आणि फहादचे लग्न अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. दरम्यान, अशातच आता स्वराने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. स्वराने तिच्या इंस्टाग्रामवर पतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिचे बेबी बंप देखील दिसत आहे.

स्वराने दिली गुड न्यूज

कोण आहे फहाद जिरार?

स्वरा भास्करने फहाद जिरार अहमदसोबत फेब्रुवारी पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. स्वराचा पती तिच्या पेक्षा वयाने 4 वर्षांपेक्षा लहान आहे. तिचा पती समाजवादी पक्षाचा नेता आहे. त्यांची पहिली भेट 2019 मध्ये झालेल्या आंदोलनात झाली. तिथेच त्यांची चांगली ओळख झाली. पुढे हळूहळू मैत्री, त्यानंतर प्रेम आणि आता त्याचे रुपांतर लग्नात झाले आहे.


हेही वाचा :आलियाने केलं लैंगिक समानतेवर भाष्य; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

First Published on: June 6, 2023 2:54 PM
Exit mobile version