‘बिग बॉस 16’ मध्ये सुद्धा होणार तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची एन्ट्री

‘बिग बॉस 16’ मध्ये सुद्धा होणार तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची एन्ट्री

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान लवकरच ‘बिग बॉस 16 ‘ हा कार्यक्रम होस्टिंग करताना दिसेल. येत्या काही दिवसांत हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ‘बिग बॉस’चा आता पुढचा भाग सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाबाबत एकानंतर एक अपडेट समोर येत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 16 ‘ मध्ये ‘बिग बॉस 15’ ची विजेती तेजश्री प्रकाश, करण कुंद्रा आणि राजीव अदातिया हे सुद्धा सहभागी होणार आहेत. तसेच ते त्यांच्यासोबतच ‘बिग बॉस 16 ‘ च्या खेळामध्ये अनेक रंग देखील भरणार आहेत.

हिना खान सुद्धा होऊ शकते ‘बिग बॉस 16’ मध्ये सहभागी
हिंदी टेलिव्हिजनवरील वादग्रस्त ‘बिग बॉस’मध्ये यावेळी हिना खान, करिश्मा तन्ना आणि करण कुंद्रा देखील एन्ट्री करतील. तसेच अब्दु रोजिक, सुंबुल तौकीर खान, निमृत कौर आहलुवालिया, सौंदर्या शर्मा आणि मॅक स्टॅन हे सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा :

वरूण धवन आणि कृती सेननच्या ‘भेडिया’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

First Published on: September 30, 2022 4:12 PM
Exit mobile version