घरमनोरंजनवरूण धवन आणि कृती सेननच्या 'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

वरूण धवन आणि कृती सेननच्या ‘भेडिया’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

या चित्रपटासोबतच वरूण धवन धमाकेदार कमबॅक करत आहे. नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या टीझरमध्ये घनदाट जंगलामध्ये लांडगे येताना दिसतात.

बॉलिवूड अभिनेता वरण धवन आणि अभिनेत्री कृती सेनन यांच्या बहुप्रतिक्षीत आगामी ‘भेडिया’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 45 सेकेंदाच्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटासोबतच वरूण धवन धमाकेदार कमबॅक करत आहे. नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या टीझरमध्ये घनदाट जंगलामध्ये लांडगे येताना दिसतात. हा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक कौतुक करत आहेत.

चाहत्यांना आवडलं भेडियाचं टीझर
वरूण धवन आणि कृती सेननचा हा टीझर प्रेक्षकांना आवडला असून अनेकजण या टीझरवर कमेंट करत आहेत. यापैकी एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, “100 कोटी रूपये पक्के झाले आहेत”. तर दुसऱ्या यूजरने लिहिलंय की, “मेडॉक चित्रपट कधीही निराश होत नाही…आता फक्त वरूण धवनने ओव्हर अॅक्टिंग करायला नको”.

- Advertisement -

कधी होणार प्रदर्शित

- Advertisement -

अमर कौशिक दिग्दर्शित भेडिया चित्रपट येत्या 25 ओक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भेडिया हा सिनेमा ‘कॉमेडी हॉरर सिनेमा’ आहे. सिनेमात वरुण हा ‘मिलिट्री ऑफिसर खेत्रपाल’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.सिनेमाचे शुटींग हे अरुणाचल प्रदेशच्या घनदाट जंगलात करण्यात आले आहे. खरंतर हा सिनेमा 2020 पूर्वीच रिलीज होणार होता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा फार लांबणीवर पडला. सिनेमात मोठ्या प्रमाणात विएफेक्स इफेक्ट्स प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. वरुण धवल आणि कृती सेनन यांच्या व्यतिरिक्त सिनेमात अभिनेते अभिषेक बॅनर्जी आणि दीपक हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा :

‘मी तुम्हाला माझा आदर्श मानते’; रश्मिकाने माधुरीबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -