‘थलायवी’च्या प्रदर्शनात अडचणी, थिएटर विरुद्ध ओटीटी ‘सामना’

‘थलायवी’च्या प्रदर्शनात अडचणी, थिएटर विरुद्ध ओटीटी ‘सामना’

'थलायवी'चे कौतुक न केल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर कंगनाचा संताप, म्हणाली....

बॉलिवूडची पंगा क्विन कंगना रनौतचाKangana Ranaut  ‘थलायवी'((Thalaivii) चित्रपट प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवार, 10 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, कंगनासोबतच ‘थलायवी’ चित्रपटाचे मेकर्संना सिनेमा थेटरमध्ये रिलीज करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण असे की बहुतेक चित्रपटगृहांने अद्याप सिनेमा थेटरमध्ये लावण्यासाठी कोणताही निर्णय घेतला नाहीये कारण चित्रपटगृहांना थलायवी चित्रपट थिएटर मध्ये रिलीज झाल्याच्या चार आठवड्यानंतर ‘बेल बॉटम’ प्रमाणे OTT वर रिलीज करण्यात यावा अशी थिएटर मालकांची इच्छा आहे. तर ही रिलीज विंडो फक्त दोन आठवड्यांची आहे.यामुळे थलायवीच्या प्रदर्शनामध्ये वाढ होताना दिसत आहे.(Thalaivii Release Controversy Theatres Vs OTT)
‘थलायवी’ चित्रपटाच्या निर्मात्यांना सिनेमाचा हिंदी वर्जन चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनी ओटीटीवर रिलीज करायचा आहे. मात्र सिनेमाचं तमिळ आणि तेलगु वर्जन चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चार आठवड्यांनी ओटीटीवर प्रसारित केला जाणार आहे. निर्मात्यांच्या या निर्णयाचे कारण असे मानले जाते की दक्षिण भारतातील सर्व राज्यांमध्ये चित्रपटगृहे उघडली गेली आहेत, परंतु हिंदी चित्रपटांची सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात, दुसऱ्या लाटेनंतर अद्याप चित्रपटगृह उघडलेले नाहीत आणि यामुळेच निर्मात्यांना ‘थलाईवी’ सिनेमाचा हिंदी भाषेतील वर्जन लवकरात लवकर OTT वर रिलीज करून तोटा भरून काढायचा आहे.

तर दुसरीकडे, थिएटर मालकांचे म्हणणे आहे की त्यांना ‘बेल बॉटम’ सारख्या ‘थलाईवी’ साठी चार आठवड्यांची रिलीज विंडो मिळावी. अनेकांच्या मनात आता शंका निर्माण झाली आहे की सिनेमागृहे कदाचित या आठवड्यात ‘थलायवी’ सिनेमा प्रदर्शित करणार नाही.मात्र काही चित्रपटगृहे पुढील आठवड्यात सिनेमा प्रदर्शित करतील. याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


हे हि वाचा – नेहा कक्कर प्रेग्नेंट, नेहाच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन?

First Published on: September 9, 2021 4:51 PM
Exit mobile version