तापसी पन्नू अभिनीत ‘ब्लर’च्या दिग्दर्शकांनी शेअर केला नैनितालमधील शूटिंगचा अनुभव!

तापसी पन्नू अभिनीत ‘ब्लर’च्या दिग्दर्शकांनी शेअर केला नैनितालमधील शूटिंगचा अनुभव!

तापसी पन्नू अभिनीत 'ब्लर'च्या दिग्दर्शकांनी शेअर केला नैनिताल मधील शूटिंगचा अनुभव!

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu)तिच्या चित्रपटातून नेहमीच काही तरी हटके तसेच नावीन्यपुर्ण विषयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तापसी बॉलिवूड इिंडस्ट्रीमधील अत्यंत उत्तम कलाकार असून गेल्या एक दशकापेक्षा जास्त भारतीय सिनेमात तापसीने आपले योगदान दिले आहे. आता तापसी पन्नूने अभिनया सोबतच निर्मीती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. तापसी पन्नूने मागील महिन्यात आपले प्रोडक्शन हाउस आउटराइडर्स फिल्म्सची घोषणा केली होती. यानंतर तापसी आगामी सिनेमाच्या शूटींगसाठी अभिनेता गुलशन देवैयासोबतच्या नैनीतालला रवाना झाली. दिग्दर्शक अजय बहलने नैनीतालमध्ये शूट करण्याचा आपला अनुभव शेअर केला आहे.(The director of ‘Blur’ starring Tapsi Pannu shared his experience of shooting)

अजय बहल यांनी सांगितले कि, “नैनीताल कदाचित भारतातील पर्यटकांनी गजबजलेल्या सर्वात सुंदर जागांपैकी एक आहे. ‘ब्लर’च्या स्क्रिप्टला या अशाच लॅंडस्केपची गरज होती आणि आम्ही शूटिंगसाठी मॉल रोड आणि नैनीताल झीलसारख्या सुयोग्य जागा यासाठी निवडल्या होत्या. या दोन्ही जागा स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी गजबजलेल्या असतात आणि तापसीसारख्या लोकप्रिय कलाकारासोबत अशा वास्तविक स्थानांवर शूटिंग करणे खरोखरच आव्हानात्मक असते. मात्र इथल्या स्थानिकांनी संयम बाळगला, शूटिंग संपेपर्यंत सेल्फी घेणे किंवा ऑटोग्राफ घेण्यासाठी वाट पाहिली. मला या शहरातील लोकांना धन्यवाद द्यायचे आहेत कि त्यांनी आमच्या या शूटिंगसाठी याला इतके सुविधाजनक बनवले.”

बहल पुढे म्हणाले की, ”ब्लरची टीम लोकेशनवर जास्त गर्दी असल्याकारणाने रात्री शूटिंग करत होती. नैनीताल झील आणि मॉल रोडसारख्या स्थानांवर करण्यात आलेले शूटिंग सुंदर प्राकृतिक दृश्यांचे संकेत देतात जे दर्शकांना चित्रपट बघताना नक्कीच जाणवेल.”

चित्रपट ‘ब्लर’ अजय बहल यांनी दिग्दर्शित केला असून तापसी आणि गुलशन देवैया मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.


हे हि वाचा – HBD: संघर्षमय प्रवासाला मागे सारत झाकीर खान बनला प्रसिद्ध स्टँन्डअप कॉमेडियन !

First Published on: August 20, 2021 12:53 PM
Exit mobile version